Marathi News> भारत
Advertisement

तुरूंगात आसारामची प्रकृती ढासळली

आसाराम राजस्थानच्या जोधपूर तुरूंगात शिक्षा भोगत आहे.   

तुरूंगात आसारामची प्रकृती ढासळली

जयपूर : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याबद्दल तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची प्रकृती बिघडल्यामुळे तात्काळ महात्मा गांधी रूग्णालयातून माथुर रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.सीसीयू वार्डमध्ये त्याला शिफ्ट करण्यात आलं आहे. आसारामला अस्वस्थतेची समस्या जाणवू लागली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले. आसाराम  आहे. राजस्थानच्या जोधपूर जेलमध्ये आसाराम शिक्षा भोगत आहे. 

दरम्यान, मंगळवारी रात्री आसारामची तुरूंगातच तब्येत बिघडली. आसारामच्या प्रकृतीची माहिती मिळताच तुरूंग प्रशासने प्राथमिक उपचार केले. पण परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहून आसाराम यांना मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

आसारामला रक्त दाबाचा त्रास आहे. परिणामी त्याला श्वास घेण्यास अडथळे येत असल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आसारामला प्रोस्टेटची समस्या असल्याचं डॉक्टरांना कळालं. त्यानंतर आसारामला रुग्णालयाच्या सीसीयू वॉर्डमध्ये हलविण्यात आले.

आसारामच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आलं. आता ईसीजी रिपोर्ट आल्यानंतर आसाराम कॉर्डियोलॉजी डॉक्टरांकडून देखरेख होणार आहे. 

Read More