Marathi News> भारत
Advertisement

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

नवी दिल्ली : भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज एव्हाना भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

काँग्रेस मुक्त भारत करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. हा जल्लोष म्हणजे मोदी - शाहांसाठी मोठा धक्का आहे. २०१९ साठी मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. २०१४ पासून या दोघांनी सुरू केलेल्या सत्तेच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा या निकालांनी रोखलाय.
 fallbacks
२०१४ पासून भाजपच्या शब्दकोषात पराभव हा शब्दच नाही, अशी परिस्थिती होती. मोदी-शाह यांच्या यशाचं वारू चौखुर उधळेला होता आणि एकेक करत अवघा भारत भाजपच्या अधिपत्याखाली येऊन भगवा होत होता. गेल्या पाच वर्षांत या जोडगोळीच्या नेतृत्वाखाली तब्बल १८ राज्यांत भाजपने सत्ता मिळवली.  उत्तर प्रदेशात २०१४ साली भाजपचे ७२ खासदार निवडून आल्यानंतर अमित शाहांना चाणक्यची पदवी बहाल झाली. आणि भाजपच्या या चाणक्यानं पुढच्या सगळ्या निवडणुकांमनध्ये अमित शाह म्हणजे काय, हे दाखवून दिलं.

बूथ बांधणी, संघटन कौशल्य, बेरजेचं राजकारण, सोशल मीडियावरचा प्रचार या सगळ्याचा योग्य मेळ घालत निवडणुका जिंकण्याची अचूक रणनीती या चाणक्यानं साधली होती. निवडणुका म्हणजे अमितभाईंच्या बाए हात का खेल, असंच जणू समीकरण झालं होतं. पण यावेळी मात्र  हे समीकरण गडबडलं. 

चाणक्यनीती का फसली ?  

भाजपला विशेषतः अमित शाह आणि मोदी या जोडगोळीला अतिआत्मविश्वास नडला का ? नेते, कार्यकर्त्यांमधल्या सत्तेच्या धुंदीमुळे पराभव झाला का ? याची चर्चा आता सुरू झालीय. 
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बऱ्यापैकी विकास झालेला असतानाही, सत्ताविरोधी लाट थोपवण्यात भाजपला अपयश आलं. अजूनही मोदी लाट कायम आहे, याच आत्मविश्वासात भाजप गाफील राहिल्यानं हा पराभव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
 
राममंदिराचा मुद्दा देशात तापला असताना, त्यावर भाजपकडून ठोस धोरण किंवा घोषणा झाली नाही, त्याचबरोबर वसुंधरा राजेंनी मंदिरांच्या अतिक्रमणाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी, राजस्थानात ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा रोष, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सलग पंधरा वर्षांच्या सत्तेतून हवा असलेला बदल, अशा बऱ्याच कारणांसह भाजपच्या पराभवाची कारणमिमांसा करता येईल.

भाजपवर काय परिणाम होईल ? 

भाजपच्या या अपयशामुळे मित्रपक्षांचा भाजपवरचा दबाव वाढेल. युतीसाठी स्थानिक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढेल काठावर असलेले कमळापासून दुरावण्याची शक्यता जास्त आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक सोपी नाही, याचा ट्रेलर पाच राज्यांच्या निकालांनी दाखवलाय. मोदी-शाहा जोडगोळीसह मोदी लाटेवर स्वार झालेल्या सगळ्यांनाच आत्मपरीक्षणासाठी हा वेकअप कॉल आहे. 

Read More