Marathi News> भारत
Advertisement

वयाच्या 30 व्या वर्षी नक्की करा ही 5 कामं; आयुष्यभर पैशाची कमी नाही भासणार

आयुष्यभर पैशांची कमी भासायला नको म्हणून नोकरी किंवा धंद्याच्या सुरूवातीलाच आर्थिक नियोजन करायला हवे. जास्तीत जास्त पैसे वाचवण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे.

वयाच्या 30 व्या वर्षी नक्की करा ही 5 कामं; आयुष्यभर पैशाची कमी नाही भासणार

नवी दिल्ली : आयुष्यभर पैशांची कमी भासायला नको म्हणून नोकरी किंवा धंद्याच्या सुरूवातीलाच आर्थिक नियोजन करायला हवे. जास्तीत जास्त पैसे वाचवण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर बनवायचे असेल तर, लवकरात लवकर आर्थिक नियोजन सुरू करायला हवे.

 
 इमर्जेंसी फंड बनवा

 वयाच्या 30 वर्षे आत जॉब किंवा धंदा सुरू केल्यास सर्वात आधी आपली प्राथमिकता इमर्जेंसी फंड बनवण्याकडे असली पाहिजे. 6 महिने लागणारा संपूर्ण खर्च आपल्याकडे तयार असायला हवा. जॉब लॉस, मेडिकल इमर्जेंसी, इत्यादींसारख्या अडचणींच्या वेळी हा फंड कामी येतो.

 निवृत्तीचे नियोजन करा

 20 ते 30 वयोगटातील तरुणांचे निवृत्तीच्या नियोजनाकडे लक्ष कमी असते. खरे पाहता निवृत्तीसाठी फंड जमा करण्याची सुरूवात करण्याचा हा सर्वात योग्य काळ असतो.  वयाच्या 30 व्या वर्षानंतर मुलांचे शिक्षण, इतर वयक्तिक गोल, महिन्याचा खर्च, गुंतवणूक इत्यादींचा खर्च सुरू होतो. त्यामुळे निवृत्तीच्या नियोजनाचे आर्थिक नियोजन आधिच बांधून ठेवायला हवे.

 
 विम्याकडे दुर्लक्ष करू नका

 आर्थिक नियोजनामध्ये विमा कवर अनिवार्य गोष्ट म्हणून सहभागी करायला हवी. यात टर्म लाइफ प्लॅन आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. यामुळे तुमच्या कठीण काळात तुमच्या कुटूंबाला पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळते. 
 

 गुंतवणूकीचा मजबूत पोर्टफोलियो बनवा

 गुंतवणूकीसाठी शक्यतो सर्व पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका. गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी करायला हवी. रिस्क प्रोफाईल पाहून पर्याय निवडा. दीर्घ काळासाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे.  
 याशिवाय बाजारात नक्की परतावा देणारे पीपीएफ, आरडी, एनएससी, एफडी सारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. नोकरीच्या सुरूवातीला पोर्टफोलिओमध्ये तुम्ही प्रापर्टी आणि गोल्डचा देखील विचार करू शकता.

बजटवर लक्ष ठेवायला

 वयाच्या 30 वर्षे आत बचतीचा उत्तम कालावधी असतो. खरे तर तेव्हाच बचत भरपूर व्हायला हवी. कारण त्यानंतरच्या कालावधीत खर्च वाढतंच जातो. त्यामुळे दैनंदिन खर्चाचा हिशोब नक्की ठेवा. त्याची चिकित्सा करा. विनाकारण खर्च आपोआप कमी होईल. खर्च करण्याआधी बचत करा. हा मंत्र कायम लक्षात ठेवा
 
 
 
 
 
 
 
 

Read More