PIB Fact Check: भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सीमेंवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर काही फेक न्यूज व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज चांगलाच व्हायरल होतोय तो म्हणजे, देशातील एटीएम दोन ते तीन दिवसांपासून बंद राहणार आहेत? तुम्हालादेखील हा मेसेज आला असेल तर आत्ताच सावध व्हा! प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या मेसेजमागचे सत्य समोर आणले आहे. पीआयबीनुसार, व्हायरल होत असलेला व्हॉट्सअॅप मेसेज खोटा असून एटीएमवर कोणताही परिणाम होणार नाहीये.
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद असणार आहेत. पण पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित मेसेज हा खोटा असून एटीएम सुरळीत चालु असणार आहेत. व्हायरल झालेल्या मेसेजनंतर अनेकांनी एटीएमबाहेर रोख रक्कम काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळं पीआयबीने लोकांना अवाहन केलं आहे की, चुकीची माहिती पसरवली जात असून अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवू नका.
PIBने फॅक्ट चेक हँडल (@PIBFactCheck) वरुन एक ट्विट केलं आहे. एका व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की, एटीएम 2-3 दिवस बंद राहणार आहेत. पण हा मेसेज खोटा असून एटीएम सुरळीत सुरू आहेत. त्यामुळं कोणतीही खातरजमा न करता असे मेसेज व्हायरल करु नका, असं अवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. एटीएट सेवा अगदी सुरळीत सुरू आहेत, असं PIB कडून सांगण्यात येत आहे.
PIB कडून या आधीही अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारी मेसेजपासून सावध राहा, असं अवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. फक्त अधिकृत सोर्सवरच विश्वास ठेवा, असंही सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेज ही समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करणारे मेसेज वेगाने व्हायरल होत असतात.
Are ATMs closed
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025
A viral #WhatsApp message claims ATMs will be closed for 2–3 days.
This Message is FAKE
ATMs will continue to operate as usual
Don't share unverified messages.#IndiaFightsPropaganda pic.twitter.com/BXfzjjFpzD
पीआयबीच्या सल्लानुसार, कोणताही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पूर्णपणे तपासा. जर कोणतीही बातमी संशयास्पद वाटत असेल तर प्रथम अधिकृत स्रोताकडून त्याची खात्री करा.