भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ सेवेत रुजु होण्याचे आदेश आले. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्या जवानांची काय मनःस्थिती असते. यावर फोटोग्राफर आणि निर्माता अतुल कसबेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सैन्यातील जवान आपल्या घरातून निघताना त्यांची आणि कुटुंबाची काय अवस्था आहे? यावर भाष्य करणारा हा व्हिडीओ आहे. सैन्यात भरती होताना प्रत्येक जवानाला कल्पना असते की, तो देशासाठी मोठे कार्य करत आहे. आपल्याला जीवनात अशा प्रसंगांना अनेकांना सामोरं जावं लागू शकतं. पण दरवेळी हा प्रसंग त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नक्कीच जड जात असतो, यात शंका नाही.
भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीनंतर अनेक जवानांना देशसेवेसाठी सीमेवर जावं लागलं आहे. महाराष्ट्रातील जळगावचा जवान मनोज पाटील याचं लग्न झालं आणि अवघ्या दोन दिवसांतच त्यांना आपल्या सेवेसाठी रुजू व्हावं लागलं. पत्नीसोबतचा संसार सुरुही झाला नव्हता आणि आपल्या कर्तव्यासाठी त्यांना रुजू व्हाव लागलं. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हे फक्त एक उदाहरण आहे पण अशापद्धतीने अनेक जवानांना आपल्या सेवेसाठी रुजू व्हाव लागलं होतं.