Marathi News> भारत
Advertisement

धडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा

चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे. 

धडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा

Chandrayaan-3 Maneuver: चांद्रयान 3 आता अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आली आहे. 16 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा पार पडणार आहे. यावेळी ISRO च्या टीमची मोठी परिक्षा असणार आहे. कारण, या अंतिम टप्प्यात . Lunar Orbit Injection नंतर चांद्रयान- 3  चंद्रापासून 100 किमी अंतरावर आणले जाणार आहे. यानंतर चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार आहे. 

मोहिमेतील महत्वाचा टप्पा

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान- 3 अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरमधून दुपारी 2 वाजून 35  मिनिटांनी LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं.  चांद्रयान- 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आले आहे. 16 ऑगस्ट रोजी Lunar Orbit Injection नंतर चांद्रयान- 3  चंद्राच्या 100 किमी कक्षेत येणार आहे. चांद्रयान- 3 चे सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अनुषंगाने हा टप्पा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.  

लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केले जाणार

चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत.  16 ऑगस्टला चांद्रयान- 3 चंद्राच्या 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे.  हा टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. 

23 ऑगस्टला  चांद्रयान 3 चंद्रावर लँड करणार

लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर चांद्रयान 3 चंद्रावर लँड करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर लँडिग करणार आहे. सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे. 40 दिवसांच्या प्रवासानंतर  23 ते 24ऑगस्ट दरम्यान  चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.  विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.   

 

Read More