Anand Mahindra Emotional Post: भारतीय उद्योग विश्वामध्ये त्यातही भारतातील ऑटो क्षेत्रामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहानं कमालीची उंची गाठली असून, आनंद महिंद्रा यांनी याचं श्रेय कायमच या कंपनीत योगदान देणाऱ्या प्रत्येकालाच दिलं आहे. कंपनीतील कर्मचारी, अधिकारी आणि या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येकालाच महत्त्वं देणाऱ्या याच महिंद्रा यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत एका खास व्यक्तीची ओळख करून दिली.
इतरांच्या आनंदाच सहभाही होणाऱ्या महिंद्रा यांनी इथं पुन्हा एकदा त्यांची हीच बाजू सर्वांपुढं आणत डॉ. पवन गोएंका यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग सर्वांसमोर आणला. 1990 हे तेच दशक होतं, जेव्हा गोएंका आणि आनंद महिंद्रा यांची कामानिमित्त ओळख झाली. अमेरिकेतील जनरल मोटर्स येथील नोकरी सोडून याच दिवसांमध्ये गोएंका भारतात आले आणि त्यांचा प्रवेश झाला महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) मध्ये.
कंपनीच्या नाशिकमधील प्लांटमध्ये रिसर्च एंड डेवलपमेंट (R&D) विभागात त्यांना उपविभागप्रमुख हे पद देण्यात आलं. पण, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र त्यांना आपल्या भारतात येण्याच्या निर्णयाविषयी साशंकता वाटली पण, तरीही त्यांनी आपल्याला मिळालेली जबाबदारी स्वीकारली आणि पाहता पाहता त्यांनी महिंद्राची सर्वात लोकप्रिय स्कॉर्पिओ कार तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
गोएंका यांच्या नेतृत्त्वाखाली कंपनीनं जागतिक स्तरावर उल्लेखनीय प्रगती करत पुढं जाऊन त्यांच्या वाट्याला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पदही आलं. ही तिच वेळ होती जेव्हा त्यांनी या कंपनीला तांत्रिक मुद्द्यांवर पुढे जाण्यास वाव दिला. याच गोएंका यांच्या जीवनातील अतिशय खास प्रसंगी खुद्द आनंद महिंद्रा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या...
गोएंका त्यांच्या पत्नीसह कंपनीची इलेक्ट्रिक SUV, XEV 9e खरेदी करम्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनीच पाया रचलेल्या एका तंत्रज्ञानाचं आधुनिक रुप स्वीकारत त्याचा एक भाग होण्यासाठी गोएंकांना कार खरेदी करताना पाहून हे प्रोडक्ट तयार करण्यापासून त्याच्याच नव्या रुपाचा स्वीकार करण्यापर्यंतचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणत त्यांनी आनंदाच्या भावना व्यक्त केल्या.
This is not just another video for me…
— anand mahindra (@anandmahindra) March 27, 2025
When Pawan Goenka decided to return to India in the early ‘90s, leaving behind a job at General Motors, I managed to convince him to join @Mahindra_Auto at Nashik as Deputy Head of R&D
He often relates how when he first went to Nashik and… pic.twitter.com/auggd8gEQ9
2021 मध्ये महिंद्रा समुहातून निवृत्त झाल्यानंतर गोएंका यांनी इन स्पेसचं चेअरमनपद स्वीकारलं. ही एक सहकारी संस्था असून, भारतातील अवकाश क्षेत्रात खासगी कंपन्यांना पुढे येण्याच्या संधी देते. गोएंका यांच्या अद्वितीय कारकिर्दीची दखल भारत सरकारनं घेत त्यांना पद्मश्री या बहुमान आणि पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे, अशा या खास माणसासाठी खुद्द आनंद महिंद्रा यांनी केलेली पोस्ट नेटकऱ्यांचंसुद्धा मन जिंकत आहे.