Marathi News> भारत
Advertisement

विदेशी बूट घालून रामदेव बाबा गंगा किनारी

स्वदेशीचा पुरस्कार करणारे बाबा रामदेव सोशल मीडियावर  अॅक्टीव दिसतात. अनेकदा आपले फोटो टाकत असतात.

विदेशी बूट घालून रामदेव बाबा गंगा किनारी

नवी दिल्ली : स्वदेशीचा पुरस्कार करणारे बाबा रामदेव सोशल मीडियावर  अॅक्टीव दिसतात. अनेकदा आपले फोटो टाकत असतात.

नुकताच त्यांनी स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. थोड्यावेळाने तो हटवला. त्यानंतर आधीचा फोटो थोडा क्रॉप करुन पुन्हा अपलोड केला. लल्लन टॉप'ने यासंदर्भातील वृत्त दिलेय. 

 

माँ गंगा के तट पर...

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev) on

स्वदेशीचा पुरस्कार 

 योग आणि स्वदेशी साठी बाबा रामदेव ओळखले जातात. स्वदेशीचा पुरस्कार करताना ते पतंजलिचे महत्त्व नेहमी सांगत असतात.

पेस्ट, पापडपासून तांदूळ, डाळ पीठापर्यंत सर्व स्वदेशी वस्तू पतंजलिकडून मिळतात. म्हणजेच स्वदेशी हा बाबा रामदेव यांच्यासाठी भावनिक मुद्दा बनलाय. 

पायात विदेशी बुट 

बाबा रामदेव यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. यामध्ये ते नेहमीप्रमाणे भगव्या कपड्यात दिसतायत.

यावेळी ते गंगा किनारी बसलेले दिसत आहेत. त्यांच्या पायात बूट दिसतात. 

फोटो क्रॉप 

पण थोड्या वेळात हा फोटो गायब होतो. याजागी नवा फोटो अपलोड केला जातो.

यामध्ये बुट क्रॉप केलेले पाहायला मिळतात. जरी एका पायचा बुट दिसत नसला तरी दुसऱ्या पायाच्या बुटाची लेस त्यांना लपवता आली नाही. 

वुडलॅंडची बुट ?

 नेटकऱ्यांनी या फोटोवरून बाबा रामदेव यांची खिल्ली उडविली आहे. या बूटावरील लोगो स्पष्ट दिसत नाहीए.

पण हे वुडलॅंडचे बूट असल्याची चर्चा आहे. जर ही चर्चा खरी असेल तर बाबा रामदेव यांना अनेकांचा रोष ओढवला जाईल. कारण वुडलॅंड बनवणारी कंपनी परदेशी आहे. 

 

Read More