Marathi News> भारत
Advertisement

भगवान हनुमानाचा परम भक्त होता 'हा' मुस्लिम नवाब; मुलासाठी केला होता नवस!


Bade Mangal And Awadh Nawab: ज्येष्ठ महिन्यातील तिसरा बडा मंगळ आज म्हणजेच 27 मे रोजी आहे. 

भगवान हनुमानाचा परम भक्त होता 'हा' मुस्लिम नवाब; मुलासाठी केला होता नवस!

Bade Mangal And Awadh Nawab: हिंदू धर्मात ज्येष्ठ मासमध्ये भगवान हनुमानाची पूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्याच्या प्रत्येक मंगळवारला बडा मंगल किंवा बुढवा मंगल असं म्हटलं जातं. ज्येष्ठ महिन्यात बजरंगबली यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुखः नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्येष्ठ महिन्यातच त्रेतायुगात भगवान राम यांची भेट बजरंगबलीसोबत झाली होती. त्यामुळं या महिन्यात प्रत्येक मंगळवारला बडा मंगल म्हटलं जातं. ज्येष्ठ महिन्यातील तिसरा बडा मंगळ आज म्हणजेच 27 मे रोजी आहे. मात्र यासंदर्भातीलच एक पौराणिक व ऐतिहासिक कथा जाणून घेऊयात. 

बडा मंगळवार साजरा करण्याची परंपरा ऐतिहासिक शहर लखनऊ शहरापासून झाली. प्रत्येक वर्षी लखनऊ शहरात ज्येष्ठ महिन्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केलाजातो. लखनऊ शहरातच या दिवशी भंडारा सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. याची सुरुवात अवधचे नवाब मोहम्मद वाजिद अली शाह यांनी केली. ही जवळपास 200 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळचे अवधचे नवाब वाजिद अली शाह यांच्या मुलाची सतत तब्येत ढासळत असायची. मुलाची अशी अवस्था पाहून नवाबाची बेगम सतत दुखी असायची. अनेक उपचार केल्यानंतरही काहीच फरक त्याच्या तब्येतीबाबत जाणवला नाही. 

मुलाच्या तब्येतील काहीच सुधारणा नसल्याने नवाब दुखी होता. तेव्हा काही जणांनी त्याला सल्ला दिला की, अलीगंजच्या प्राचीन हनुमान मंदिरात जावून मंगळवारच्या दिवशी भगवान बजरंगबलीची पूजा करा त्यांना साकडं घाला. या सल्ल्यावर नवाबाच्या बेगमने विचार केला आणि मंदिरात जावून मुलासाठी नवस केला. काही दिवसांनंतर मुलाच्या तब्येतील सुधारणा व्हायला लागली. हा चमत्कार पाहून नवाब आणि त्याच्या बेगमने अलीगंज येथील हनुमान मंदिर पुन्हा एकदा बांधण्यात आले. हे काम ज्येष्ठ महिन्यात पूर्ण झाले होते. मंदिराचे नुतनीकरण झाल्यानंतर नवाबाने संपूर्ण लखनऊमध्ये गुळाचा प्रसाद वाटला आणि मोठा उत्सव साजरा केला. 

हळू हळू ही परंपरा इतकी लोकप्रिय झाली की लखनऊमधील प्रत्येक ठिकाणी बडे मंगल या दिवशी भंडारा लागतो आणि भगवान हनुमान यांची विशेष पूजा केली जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More