Marathi News> भारत
Advertisement

Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन

Bank Holidays in February 2024 : चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी हा महिना 29 दिवसाचा असणार आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात बँकांना 11 दिवस सुट्ट्या असणार आहे. परिणामी बँकांच्या संबंधित काही कामे असल्यास आता पूर्ण करा. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  

Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन

Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर  यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा. 

फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण बँका हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत अनेक कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.

बँकांना किती दिवस सुट्ट्या

फेब्रुवारी महिन्यात एक-दोन नव्हे तर एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. फेब्रुवारीमधील सण आणि शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये, 14 दिवस बँक बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँका कार्यरत राहतील. त्यामुळे बँकेचे कोणतेही काम करण्यापूर्वी बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून घ्या... 

एवढे दिवस बॅक बंद 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये विविध राज्यांमध्ये एकूण पाच बँक सुट्टीचे दिवस आहेत. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी येणाऱ्या सुट्ट्यांसह फेब्रुवारीत 11 दिवस सुट्ट्या आहेत. याशिवाय रविवार सुट्ट्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी महिन्यात एकूण 15 दिवस बँकांना सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्टया बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून जाहीर करण्यात येते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्यां सणावर आधारित असते. 

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्टयांची यादी

4 फेब्रुवारी: रविवार
10 फेब्रुवारी: दुसरा शनिवार
11 फेब्रुवारी: रविवार
10 ते 12 फेब्रुवारी: लोसरनिमित्त सिक्कीम राज्यात बँकेला सुट्टी.
14 फेब्रुवारी: वसंत पंचमीनिमित्त हरियाणा, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँक बंद पाळण्यात आली.
15 फेब्रुवारी: लुई-नगाई-नीसाठी मणिपूरमध्ये बँकन्ना सुट्टी असेल.
18 फेब्रुवारी: रविवार
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद.
20 फेब्रुवारी: मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिवस किंवा राज्यांमध्ये सुट्टी
24 फेब्रुवारी : चौथा शनिवार
25 फेब्रुवारी: रविवार 

Read More