Marathi News> भारत
Advertisement

Bank Holidays | उद्यापासून बँका सलग काही दिवस बंद; आजच सर्व कामे पूर्ण करा

 बँकांची कामं आजच उरकून घ्या, कारण पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

Bank Holidays | उद्यापासून बँका सलग काही दिवस बंद; आजच सर्व कामे पूर्ण करा

मुंबई : बँकांची कामं आजच उरकून घ्या, कारण पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहतील. शनिवार रविवार आणि बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामं करून घ्या, नाहीतर कामं संपण्यासाठी थेट मंगळवारची वाट पाहावी लागेल. 

बँकांशी संबधीत काही कामे असतील तर ती आजच उरकून घ्या. कारण पुढचे 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. सोमवारी बुद्ध पौर्णिमेमुळे बँका बंद राहणार आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या बँकांच्या सुट्यांच्या यादीत बौद्ध पोर्णिमेचाही सामावेश आहे. यामुळे शनिवार, रविवार, सोमवार बँका बंद राहणार आहेत.

Read More