Marathi News> भारत
Advertisement

Bank Holiday : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवस बँका राहणार बंद

बँकांच्या यादी आरबीआयकडून जाहीर

Bank Holiday : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवस बँका राहणार बंद

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित काही काम असतील तर ती लवकरच पूर्ण करा. नोव्हेंबर 2021 मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरूनानक जयंती यासारख्या सुट्टया आहेत. अशावेळी एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र यामध्ये भारतभरातील सुट्यांचा समावेश आहे. 

17 दिवस बँका राहणार बंद 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. या दरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्ट्या आहेत.

महाष्ट्रात या दिवशी बँका राहणार बंद

2 नोव्हेंबर - धनत्रयोदशी

4 नोव्हेंबर - नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन

5 नोव्हेंबर - दिवाळी (बलिप्रतिपदा) 

6 नोव्हेंबर - भाऊबीज

7 नोव्हेंबर - रविवार

Read More