Marathi News> भारत
Advertisement

Bank Job: एसबीआयमध्ये नोकरी हवीय? 50 हजारपर्यंत मिळेल पगार; 'असा' करा अर्ज

SBI Recruitment 2025: एसबीआयच्या या भरतीद्वारे एकूण 269 पदे भरली जाणार आहेत. 

Bank Job: एसबीआयमध्ये नोकरी हवीय? 50 हजारपर्यंत मिळेल पगार; 'असा' करा अर्ज

SBI Recruitment 2025: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एसबीआयने एफएलसी काऊन्सिलर आणि एफएलसी संचालक पदांची भरती केली जाणार आहे.एसबीआयच्या या भरतीद्वारे एकूण 269 पदे भरली जाणार आहेत. एसबीआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे 

कशी होईल निवड?

उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.सूचना आणि अर्जाची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. 

किती मिळेल पगार?

एसबीआयमध्ये क्लरिकल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये, जेएमजीएस-I पदासाठी 40 हजार रुपये, एमएमजीएस-II साठी 45 हजार रुपये, एमएमजीएस-III: 45 हजार रुपये आणि एसएमजीएस-IV पदासाठी 50 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

एसबीआय भरती प्रक्रिया सुरु झाली असून 21 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्हालाही येथे काम करायचे असेल तर विलंब न करता तुम्ही वर दिलेली अधिकृत सूचना वाचून अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट्स तपासत राहावेत. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. 

एसबीआय भरती 2025 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एसबीआय भरती 2025 अर्ज प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करा

Read More