Marathi News> भारत
Advertisement

नको ती हिंमत करणं जीवावर बेतलं! पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये घातली SUV; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

दिल्ली (Delhi) आणि एनसीआरला (NCR) पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. पावसाने येथे धुमाकूळ घातला आहे.   

नको ती हिंमत करणं जीवावर बेतलं! पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये घातली SUV; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

पावसामुळे अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात एसयुव्ही बुडाल्याने बँक मॅनेजर आणि कॅशिअरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली आणि एनसीआरने तुफान पावसाने हजेरी लावली असून यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसामुळेच अंडरपासमध्ये पाणी साचलं होतं, ज्यामध्ये एसयुव्ही बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या सेक्टर 31 मधील एचडीएफसी बँकेचे ब्रांच मॅनेजर पुण्यश्रेय शर्मा आणि कॅशिअर विराज द्विवेदी शुक्रवारी संध्याकाळी महिंद्रा XUV700 मधून घरी परतत होते. जुन्या फरिदाबाद रेल्वे अंडरपासजवळ पोहोचल्यानंतर त्यांना पाणी भरलेलं दिसलं. पण पाणी किती आहे याचा अंदाज घेणं त्यांना जमलं नाही. अंदाज चुकल्याने अखेर ते बुडाले. 

एसयुव्ही पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघांनी कारबाहेर पडण्याचा आणि पोहत सुरक्षित जागा गाठण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात दोघेही बुडाले. एसयुव्ही पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले होते. यावेळी शर्मा यांचा मृतदेह गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आला. मात्र द्विवेदी यांचा मृतदेह पहाटे 4 वाजता हाती लागला. त्याआधी कित्येक तास मृतदेहासाठी सर्च ऑपरेशन सुरु होतं.

दिल्ली आणि एनसीआरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी अती-मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील हवामान स्थितीमुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं होतं. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यानंतर एनसीआरमधील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारीही पाऊस सुरु असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत या महिन्यात 1000 मिमी पाऊस पडला आहे. 2021 नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. 

Read More