Marathi News> भारत
Advertisement

लवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद

मार्च महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.

लवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मार्च महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.

या ४ दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यालय देखील बंद असतील. २९ मार्चला भगवान महावीर यांची जयंती आहे. ३० मार्चला गुड फ्रायडे आहे. ३१ मार्चला बँकांची क्लोजिंग डेट आहे. या दिवशी बँका कोणतेही व्यवहार नाही करत.

31 मार्च महिन्याचा शेवटचा रविवार

नियमानुसार शेवटच्या शनिवार सरकारी कार्यालय बंद राहतील. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँका बंद आहे. २९ मार्च ते १ एप्रिल असे ४ दिवस बँका बंद राहणार आहेत.

कामकाजासाठी महत्त्वाचं

आयकर, जीएसटी, विमा प्रीमियम जमा करण्याची शेवटची तारीख आता २७ मार्च असणार आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार लवकरात लवकर करुन घ्या. सरकारी कार्यालयांना देखील आर्थिक वर्षातील शेवटचे व्यवहार २८ मार्च पर्यंत पूर्ण करायचे आहेत. कारण २८ मार्चनंतर ड्राफ्ट ही नाही बनणार आणि चेक क्लिअरन्स देखील होणार नाही.

Read More