Marathi News> भारत
Advertisement

Hydroxychloroquine ने धोका नाही, कोरोना इलाजासाठी होऊ शकतो वापर - ICMR

'कोरोना व्हायरसच्या  खबरदारीच्या उपचारात वैद्यकीय देखरेखीखाली वापर सुरु ठेवू शकतो'

Hydroxychloroquine ने धोका नाही, कोरोना इलाजासाठी होऊ शकतो वापर - ICMR

नवी दिल्ली : भारतात मलेरिया-रोधी औषधं Hydroxychloroquine (HCQ)चे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR) मंगळवारी सांगितलं. कोरोना व्हायरसच्या इलाजासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिस्क-प्रॉफिटच्या आधारावर याचा वापर करावा असं आयसीएमआरने म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या ट्रायलवर बंदी घातली असल्याचं सांगितल्यानंतर, आयसीएमआरने याच्या वापराबाबत हे वक्तव्य केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्येयियस यांनी (Tedros Adhanom Ghebreyesus) सोमवारी Hydroxychloroquine सुरक्षा डेटाची समीक्षा होईपर्यंत त्याच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात यावी असं सांगितलं होतं.

ICMRचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं की, कोरोना व्हायरससाठी अनेक औषधं तयार केली जात आहेत. आपण HCQचा कोरोना व्हायरसच्या  खबरदारीच्या उपचारात वैद्यकीय देखरेखीखाली वापर सुरु ठेवू शकतो.

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूदरबाबत बोलताना ICMRच्या महासंचालकांनी सांगितलं की, भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर कमी आहे, ही अतिशय चांगली बाब आहे. याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात, परंतु कोणत्याही गोष्टीबाबत स्पष्टपणे बोलू शकत नाही. मात्र हा मृत्यू दर असाच कमी राहील अशी आशा असल्याचं ते म्हणाले.

भारतात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोनाचे 1.45 लाख रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 4,167 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे भारतात आतापर्यंत 60,491 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

Read More