Marathi News> भारत
Advertisement

क्रूड तेलाच्या किंमती नरमल्या...पेट्रोल डिझेल होणार आणखी स्वस्त

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने रुपया देखील वधारलायं. 

क्रूड तेलाच्या किंमती नरमल्या...पेट्रोल डिझेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली : क्रूड तेलाच्या किंमती 63 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी आल्याने देशातील तेलाच्या किंमतीत आणखी घट होऊ शकते. क्रूड तेल ऑक्टोबरमध्ये 86  डॉलर प्रति बॅरलनंतर 4 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर गेलं होतं. क्रूड सप्लाय वाढल्याने तसेच ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ कमजोर झाल्याने या दरात कपात झाल्याचे म्हटलं जातंय. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने रुपया देखील वधारलायं.

रुपया मजबूत 

खूप मोठ्या काळाच्या घसरणीनंतर आता रुपयांत मजबूतीचा ट्रेंड सुरू झालायं.

हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. '2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता पण डिसेंबर पर्यंत भारतीय करंसी दोन ते तीन टक्क्यांनी मजबूस होऊ शकते', असं स्टैंडर्ड चार्टर्डमध्ये साउथ एशियाचे फॉरन एक्सचेंज, रेट्स आणि क्रेडिट हेड गोपीकृष्णन एमएस सांगतात.

ग्राहकांना दिलासा 

17 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर पेट्रोल 6.45 रुपये आणि डिझेल 4.42 रुपये प्रति लीटर स्वस्त झालं.

गुरुवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिेझेलचे दर 71.27 रुपये प्रति लीटर झालं.

सरकारी कंपन्यांनी क्रूडच्या नरमीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला तर किंमती आणखी कमी होऊ शकतात.

आज मुंबईत पेट्रोल 81.50 रुपयांनी तर डिझेल 74.34 रुपयांनी मिळतंय. 

 

Read More