Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : लग्न ठरताच नवरा-नवरीनं समुद्रात मारली उडी

 लग्न ठरलं आणि या कारणामुळे दोघांनी समुद्रात मारली उडी

Viral Video : लग्न ठरताच नवरा-नवरीनं समुद्रात मारली उडी

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकण्याच्या तयारीत असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरा-नवरी ट्रेंडी कपल म्हणून प्रसिद्धीस येण्यासाठी चक्क समुद्रात उडी मारली. नवरा-नवरीची ही हिंमत चक्क करणारी आहे.   

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी ब्रायडल कपड्यांमध्ये दिसत आहे. दोघे समुद्राच्या मध्यभागी एक बोटमध्ये एकमेकांचा हात धरून उभे आहेत. मध्येच दोघे समुद्रात उडी घेताना दिसत आहेत. दोघेही एवढा मोठा स्टंट फक्त वेडिंग फोटोशूट (Wedding Photoshoot) आणि व्हिडिओसाठी करताना दिसत आहेत. 

या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 82 युझर्सने पाहीला आहे. काहींना या व्हिडिओवर टीका केली आहे. त्यामुळे व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारू नका. 

Read More