Marathi News> भारत
Advertisement

40 लाखांचं पॅकेज, Resume ची गरज नाही अन्... भारतीय कंपनीची भन्नाट जॉब ऑफर; फ्रेशर्सलाही संधी

Company 40 LPA Job Posting Offer: या कंपनीच्या मालकानेच कंपनीतील या नोकरीसंदर्भातील माहिती दिली आहे.

40 लाखांचं पॅकेज, Resume ची गरज नाही अन्... भारतीय कंपनीची भन्नाट जॉब ऑफर; फ्रेशर्सलाही संधी

Company 40 LPA Job Posting Offer: नोकरी हवी म्हणजे चांगलं शिक्षण हवं आणि सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मागायला जाताना चांगला रेझ्युमे हवाच. मात्र एका कंपनीने या साऱ्या गोष्टींना फाटा देत नोकरीची आगळीवेगळी ऑफर दिली आहे. म्हणजेच आयआयटी किंवा नामांकित कॉलेजची डिग्री नको, रेझ्युमे नको किंवा पैसेही नकोत असं म्हणत कंपनीने ही अनोखी जॉब ऑफर समोर ठेवली आहे. ही कंपनी बंगळुरुमधील असून इंजिनिअर्सच्या शोधात आहे. बरं यासाठी कंपनी तब्बल दरवर्षी 40 लाख रुपये म्हणजेच महिना साडेतीन लाख रुपये पगार देण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

कंपनीने काय म्हटलंय?

कंपनीने, 'आम्हाला cracked full-stack engineer हवे आहेत,' असं कंपनीच्या मालकाने म्हटलं आहे. 'प्रत्येक व्यक्तीसाठी रिअल टाइम एआय तयार करण्यासाठी हे इंजिनिअर्स हवे आहेत,' असं कंपनीचं म्हणणं आहे. बरं वर्षाला 40 लाखांच्या पगाराच्या या ऑफरमध्ये कायम फाइव्ह डेज विक म्हणजेच शनिवारी, रविवारी सुट्टी असणार आहे. या नोकरीसाठी अगदी फ्रेशर्स पासून दोन वर्षांचा अनुभव असलेलं कोणीही अर्ज करु शकतं असं कंपनीने म्हटलं आहे.

नोकरी हवी असेल तर काय करायचं?

या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला केवळ तुमचं इंट्रोडक्शन 100 शब्दांमध्ये लिहून पाठवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या कामाचा एक छोटा नमुनाही कंपनीला पाठवायचा आहे. या नोकरीसंदर्भात एक्स (आधीचं ट्वीटर) वरुन महिती देण्यात आल्याने एकाने, 'एक्स आता लिंक्डइन झालं आहे,' असा टोला लगावला आहे. अन्य एकाने, 'रेझ्युमेपेक्षा कौशल्याला प्राधान्य दिलं जातंय हे चांगलं आहे,' असं म्हटलं आहे. तिसऱ्याने, "हे फारच भन्नाट असून भविष्यात अशाच पद्धतीने नोकऱ्या ऑफर केल्या जातील," असं म्हटलं आहे. 

कंपनीचं नाव काय?

बंगळुरुमध्ये कार्यालया असलेल्या या कंपनीने देऊ केलेली ही जॉब ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत असून त्यांनीच ट्वीटरवर यासंदर्भातील पोस्ट लिहिली होती. या कंपनीचं नाव स्मॉलेस्ट डॉट एआय असं आहे. ही मूळची कॅलिफॉर्नियामधील कंपनी असून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात काम करते.

कुठे पाठवायचा अर्ज?

कामत यांनी info@smallest.ai. या इमेल आयडीवर इच्छूकांनी आपली माहिती 100 शब्दांमध्ये पाठवावी आणि सोबत आपल्या कामाचा नमुनाही पाठवावा असं आवाहन केलं आहे.

Read More