Bengaluru Molestation: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका अरुंद गल्लीतून चालत जाणाऱ्या तरुणीची मागून येणाऱ्या पुरूषाने छेड काढली. तिला नकळत पकडून कोपऱ्यात नेले आणि नको तिथे स्पर्श केला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
बेंगळुरूच्या बीटीएम लेआउटमध्ये ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओवरील टाइमस्टॅम्पनुसार ही घटना 3 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजून 52 मिनिटांनी घडली. घटनेनंतर पीडित धक्क्यातून सावरु शकली नाही. भेदरलेल्या अवस्थेत तिथून निघून गेली.
A woman was molested in Bengaluru's BTM Layout on April 4. CCTV footage captured a man following two women, groping one, and then fleeing the scene.
— M@dm@n (@deadripper07) April 6, 2025
What the hell is happening in the city? Women ain't safe from these molestation. pic.twitter.com/qsaS6nu1mu pic.twitter.com/jL0axcVEse
अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. असे असले तरी व्हिडिओमधील महिला पुढे न आल्यास आम्ही स्वतःहून औपचारिक तक्रार नोंदवू असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
बंगळुरूमध्ये महिलांवरील लैंगिक छळाच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये एका 24 वर्षीय तरुणीला 2 पुरूषांनी जबरदस्तीने बुक केलेल्या कॅबमध्ये घुसवले आणि छळ केला. कमनहल्ली येथील रहिवासी असलेली ही महिला कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही घटना 27 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. एका महिलेने तिच्या मैत्रिणीला घेण्यासाठी कॅब बुक केली होती. महिलेने गाडी चालवताच दोन अज्ञात पुरूष गाडीत घुसले. यानंतर पुरुष आणि कॅब चालक यांच्यात हाणामारी झाल्याची माहिची पोलिसांनी सांगितले. यानंतर महिलेने घाबरून कॅब सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आरोपींपैकी एकाने तिचा पाठलाग केला आणि तिचा गळा धरला तर दुसऱ्याने तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. महिलेने मदतीसाठी ओरड केली पण तोपर्यंत आरोपी पळून गेला होता.