Marathi News> भारत
Advertisement

पतीच ठरला हैवान, पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, नंतर घडलं भयंकर हत्याकांड

Crime News In Marathi: बेंगळुरुत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

 पतीच ठरला हैवान, पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, नंतर घडलं भयंकर हत्याकांड

Crime News In Marathi: बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीचे नातेवाईकासोबत अनैतिक संबंध समोर आल्यानंतर दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या गुप्तांगावर चाकुने वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. बेंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, आरोपीची बहिणी जेव्हा त्यांच्या घरी आली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. 

मृत महिलेचे नाव नागरत्ना आणि आरोपीचे नाव अय्यप्पा असल्याचे समोर आले आहे. अयप्पा आणि नागरत्ना यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती. दोघांनाही 11 आणि 7 वर्षांचे दोन मुलं आहेत. अयप्पा एक मजूर आहे तर नागरत्ना एका दुकानात काम करायची. एका पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, नागरत्नाचे तिच्याच एका नातेवाईकांसोबत अनैतिक संबंध होते. 3 जून रोजी चंद्रा आणि नागरत्ना हे त्यांच्या घरी असताना अचानक अयप्पा आले. पत्नीला दुसऱ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना बोलवून घेतले. घरातील मोठ्या व्यक्तींनी दोघांचीही भांडणं सोडवत चंद्राला यापुढे नागरत्नासोबत संबंध न ठेवण्याची ताकिद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रा आणि नागरत्ना यांच्यातील संबंध समोर आल्यानंतर अयप्पाने मोठा गोंधळ घातला. मात्र, घरातील मोठ्यांना त्यांच्यातील वाद मिटवला. त्यानंतर रविवारी रात्री अयप्पाने नागरत्नाकडे शारिरीक संबंधांची मागणी केली. मात्र तिने नकार दिला. यामुळं चिडलेल्या अयप्पाने पुन्हा तिच्यासोबत वाद घातला. रागाच्या भरात त्याने महिलेच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आणि चाकू भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर तो घरातून पळून गेला. अयप्पाची मोठी बहिण घरी आल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी अयप्पाचा शोध घेत त्याला अटक  केली आहे. अय्यपावर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

पत्नीची गळा दाबून हत्या

बंगळुरुमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर तो तिच्याच मृतदेहाशेजारी झोपून राहिला होता. व्यंकटेश असं आरोपीचे नाव असून नेत्रावती असं पत्नीचे नाव आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच रोजच्या वादातून आरोपीने साडीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर तो तिच्याच मृतदेहाशेजारी झोपून राहिला. सकाळी महिलेच्या 9 वर्षांच्या मुलाने आईला उठवले मात्र तिची काहीच हालचाल झाली नाही.

मुलाचा आवाज ऐकून काही शेजारी घरात आले त्यांनी पाहिले असता नेत्रावती हिचा मृत्यू झाला होता. त्यांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

Read More