Marathi News> भारत
Advertisement

घरबसल्या 50 हजार रुपये महिना व्याज मिळवा, आज सुरू करा गुंतवणूक

गुंतवणुकीवर सर्वोत्तम परतावा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, निवृत्तीनंतर गुंतवलेले पैसे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त उपयोगी पडावेत, असा प्रत्येक गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो.

घरबसल्या 50 हजार रुपये महिना व्याज मिळवा, आज सुरू करा गुंतवणूक

मुंबई : स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर गुंतवणूक करायला हवी. महागाईचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एका अंदाजानुसार, निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांची गरज असेल, तर लवकरच तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.

सध्या बँकांचा सरासरी वार्षिक व्याजदर 5 टक्के आहे. सध्या तो कमी होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत दरमहा 50 हजार रुपयांच्या व्याजासाठी तुमच्याकडे 1.2 कोटींचा निधी असायला हवा. त्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी.

12 टक्के सरासरी परतावा

उदाहरणार्थ, आता तुम्ही 30 वर्षांचे आहात. यावेळी तुमच्या नावाने 3500 रुपये दरमहा SIP करणे सुरू करा. SIP च्या सध्याच्या फेरीत, तुम्हाला किमान 12% वार्षिक परतावा मिळणे अपेक्षित आहे.

1.25 कोटी रुपयांचा निधी 

30 वर्षे दरमहा 3500 रुपये जमा करून, तुम्ही 12.60 लाख रुपये गुंतवता. यावर, जर तुम्हाला वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळत असेल, तर 30 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे 1.23 कोटींचा निधी तयार असेल.

दरमहा 50 हजार व्याज 

जर तुम्ही 1.23 कोटी रुपयांच्या निधीवर वार्षिक 5 टक्के दराने व्याजाचे गणित केले तर ते वार्षिक 6.15 लाख रुपये येते. अशा प्रकारे, तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न सहज मिळेल.

म्युच्युअल फंड आणि त्यांचे उत्पन्न

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत 20.04 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. दुसरीकडे, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 18.14 टक्के आणि इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजनेने 16.54 टक्के दिले आहेत.

Read More