Marathi News> भारत
Advertisement

चुलीवर वहिनी बनवत होती जेवण; दिराने असा प्रश्न विचारताचं लाटनं घेवून त्याच्या मागे पळाली

चुलीवर जेवण बनवणाऱ्या वहिनीला दिराने मागून धक्का मारून असा कोणता प्रश्न विचारला

चुलीवर वहिनी बनवत होती जेवण; दिराने असा प्रश्न विचारताचं लाटनं घेवून त्याच्या मागे पळाली

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा काळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. रोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामुळे सर्वांना हसू येत. आता देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिण यांचा नाही तर वहिनी आणि दिराचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वहिनी आणि दिराच्या नात्यात मस्ती, मस्करी आणि आनंद असतो. पण या व्हिडिओमध्ये तर वहिनी चक्क दिराच्या मागे लाटनं घेवून लागली. 

इंटरनेट व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वहिनी चूलीवर जेवण बनवताना दिसत आहे. तेव्हा दिर मागून येतो, वहिनीच्या थांद्यावर धक्का मारतो आणि हरियाणी भाषेत एक गाणं बोलतो की, 'भाभी आप मेरे लिए डीजे बजा दो, और अपनी छोटी बहन से शादी करवा दो...' हे हरियाणी गाणं ऐकताचं वहिनी आश्चर्य चकित झाली. 

दिराकडून हरियानी गाणं ऐकताचं वहिनीने जवळ  असलेलं लाटनं हातात घेतलं आणि दिराच्या मागे पळायला सुरूवात केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिराची अशी मस्ती पाहून वहिनीलाही हसू आवरत नाही. हा व्हिडिओ  रेखा सुमित मीणा या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

Read More