Marathi News> भारत
Advertisement

‘Bhookha hi rahunga, sahi hai?’: बर्गर न मिळाल्यावर चिमुकल्याची गोड प्रतिक्रिया

रूसनं एवढं गोंडस असू शकतं 

‘Bhookha hi rahunga, sahi hai?’: बर्गर न मिळाल्यावर चिमुकल्याची गोड प्रतिक्रिया

मुंबई : आपल्या आवडीचा पदार्थ न मिळाल्यावर रागावणं देखील किती सुंदर असू शकतं, हे या व्हिडीओतून कळतं. एका चिमुकल्याची बर्गर न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

या मुलाने आकाशी रंगाचा कुर्ता आणि पजामा घातला आहे. अगदी गोंडस असा हा मुलगा आईवर रागावलाय,'माझ्याशी बोलू नका...' असं म्हणत या संभाषणाला सुरूवात झाली आहे. 'तू तुझा बर्गर खा. मी तुझ्या बर्गरकडे बघणार पण नाही. तू तुझा बर्गर लवकर खाऊन घे. माझ्याशी बोलू पण नकोस.' असं लडीवारपणे बोलणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओच्या मागे एका बाईचा आवाज येत आहे. ती त्याची आई असावी.'भाई, सोड ना बर्गर तू नको खाऊस. मला फक्त बर्गर खाताना बघं.' असा संवाद या महिलेचा चिमुकल्याशी सुरू आहे. 'तू तुझ्या वडिलांकडून पैसे का घेतले नाहीस?' असा सवाल यामध्ये विचारला जात आहे. 

गोड अशा या संवादानंतर चिमुकला रागाने दरवाजाकडे निघून जातो. तेव्हा या महिलेला आपलं हसू आवरत नाही. या व्हिडीओने सगळ्यांनाच आनंद मिळाला होता. या व्हिडीओतील बाळाचे अतिशय लाड केले जात आहेत. ट्विटरवर या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे. 

Read More