Marathi News> भारत
Advertisement

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: भारतात लग्नाचं कायदेशीर वय विचाराल तर मुलींसाठी किमान 18 वर्षे तर मुलांसाठी 21 वर्षे इतकं आहे. पण लग्नासाठी कमाल वयाचं बंधन आपल्याकडे नाही. त्यामुळे तारुण्यातच लग्न करायला हवं हा विचार आता मागे पडू लागला आहे. माणसाच सरासरी आयुष्य 80 ते 90 असताना शंभरी ओलांडलेल्या आजोबांनी लग्नगाठ बांधली आहे. ही त्यांच्या लग्नाची तिसरी वेळ आहे. तर वधूची ही लग्नाची दुसरी वेळ आहे. या दोघांनी एकमेकांशी विवाह करण्यामागे त्यांची स्वत:ची काही कारणं आहेत. कोण आहेत हे गृहस्थ? कोण आहे त्यांची वधू? याबद्दल जाणून घेऊया. 

मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे. खरतर हे लग्न 2023 मध्ये झाले होते पण याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यातील वर हा 103 वर्षांचा तर वधू 49 वर्षांची आहे. हबीब नजर असे 103 वर्षांच्या वराचे नाव आहे. हबीब हे भोपाळमधील स्वतंत्रता सेनानी असून ते तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहेत. गेल्यावर्षी त्यांचे लग्न झाले होते. पण कोणीतरी आता त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यामुळे 103 वर्षाच्या नवरदेवाची चर्चा चौकाचौकात होऊ लागली आहे. 

एकटेपणा घालवण्यासाठी...

हबीब नजर हे भोपाळच्या इतवारामध्ये राहतात. त्यांचे पहिले लग्न नाशकात झाले होते तर दुसरे लग्न लखनौमध्ये झाले होते. पण काही दिवसांपुर्वीच त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. यानंतर हबीब दुखातून सावरु शकले नाहीत. त्यांना पुढचं आयुष्य एकट्याला काढावं लागणार होतं, जे त्यांच्यासाठी फार वेदनादायी होतं. आपला एकटेपणा घालवण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

फिरोज जहॉं असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. फिरोज यांच्या पतीचेदेखील निधन झाले होते. त्यामुळे त्यादेखील एकट्या आयुष्य व्यतीत करत होत्या. हबीब यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हत म्हणून मी या लग्नाला होकार दिल्याचे फिरोज सांगतात. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. ते हबीब आणि फिरोज यांच्या बाबतीत खरं वाटू लागलंय.

Read More