Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक ! भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला

भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरवर हल्ला झाल्याची बातमी आहे.

धक्कादायक ! भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला

नवी दिल्ली : भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरवर हल्ला झाल्याची बातमी आहे. या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असं सांगण्यात येतंय की, या हल्ल्याच्या माध्यमातून एनआयसीच्या अनेक महत्त्वाच्या कम्प्युटरर्सवर निशाणा साधण्यात आला आहे. तशीच महत्त्वाची संवेदनशील माहिती देखील उडवण्यात आल्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती लीक होण्याची शक्यता

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये (National Informatics Center) पंतप्रधान, एनएसए या सारख्या राष्ट्रीय हिताशी संबंधित संस्थांची महत्त्वाची माहिती असते. म्हणून हा सायबर हल्ला धक्कादायक मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सायबर हल्ला (Cyber Attack) बंगळुरु बेस्ड एका फर्मकडून करण्यात आला आहे. 

ज्याची लिंक अमेरिकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयटीच्या डाटा बेसमध्ये राष्टीय सुरक्षेशी (National Security) संबंधित माहिती असते. यात भारतीय नागरिकांशी संबंधित तसेच व्हीव्हीआयपी लोकांची देखील माहिती असते.

ई-मेलच्या माध्यमातून हल्ला

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयसीच्या सिस्टम्सवर ई-मेलच्या माध्यमातून मालवेअर पाठवण्यात आला. यात एका लिंकवर क्लिक करताच सर्व माहिती गायब झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चौकशी हाती घेतली आहे, या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

बंगळुरूच्या कंपनीचा हात, अमेरिकेत लिंक?

एनआयसी कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार जेव्हा मेलची चौकशी करण्यात आली, तर त्याची लिंक बंगळुरूशी संबंधित कंपनीशी असल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून आलं. पोलिसांनी या कंपनीचा आयपी अॅड्रेस तपासला तर ती लिंक अमेरिकेतील एका कंपनीत असल्याचं समोर आलं आहे.

Read More