India Will Split Into Two Parts : जगभरात अनेक भौगोलिक घडामोडी घडत आहेत. यांचा परिणान विविध देशांवर तसेच प्रांतावर होत आहे. या भौगोलिक घडामोडीचा जबरदस्त फटका भारताला बसणार आहे. हा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. भारतीय खंड दोन भागत विभागला जाणार आहे. जमिनीचा आकार, नद्यांची दिशा आणि पर्वतांची स्थिती बदलणार अशी देखील भिती व्यक्त केली जात आहे. हिमालयाच्या खालीच या धोक्याचा केंद्रबिंदू आहे.
अमेरिकेच्या एका नवीन वैज्ञानिक अहवालात भारताच्या भौगोलित स्थितीतबाबात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या अहवालाने भारतासह संपूर्ण आशिया खंड चिंतेत आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, भारत ज्या टेक्टोनिक प्लेटवर आहे ती आतून तुटू लागली आहे. त्याचा परिणाम येत्या काळात विनाशकारी भूकंप, हवामानात बदल आणि जमिनीच्या नकाशात मोठे बदल घडवून आणू शकतो.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे भूभौतिकशास्त्रज्ञ सायमन क्लेम्पेरर आणि त्यांच्या टीमने एक आश्चर्यकारक प्रक्रिया ओळखली आहे. ज्याला त्यांनी 'डिलेमिनेशन' असे नाव दिले आहे. याचा अर्थ असा की भारतीय टेक्टोनिक प्लेटचा जड, दाट भाग आता हळूहळू तुटत आहे आणि पृथ्वीच्या खोलवर बुडत आहे. जणू काही आपल्या जमिनीचा एक भाग शांतपणे पृथ्वीच्या आत सरकत आहे. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या एका नवीन अभ्यासानुसार, गेल्या 60 दशलक्ष वर्षांपासून भारतीय प्लेट उत्तरेकडे सरकत आहे. या टक्करमुळे हिमालयासारखे पर्वत तयार झाले होते, परंतु आता ही टक्कर धोकादायक वळण घेत आहे.
संशोधनातून असे दिसून आले आहे की प्लेटचे जड भाग आता स्वतःला आधार देऊ शकत नाहीत. हे भाग तुटत आहेत आणि खाली जात आहेत. ही प्रक्रिया मंद आहे परंतु त्याचे परिणाम मोठे असू शकतात. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हिमालय आणि त्याच्या शेजारील उत्तर भारतातील भाग सर्वात संवेदनशील आहेत. तेथे जमिनीखाली आधीच खूप दाब आहे.
जर प्लेट्स तुटण्याचे हे प्रमाण वाढले तर उत्तर भारत, नेपाळ, तिबेट आणि ईशान्य भारतात भूकंपांची तीव्रता आणि वारंवारता वाढू शकते. उत्तर भारत आधीच भूकंपप्रवण क्षेत्र आहे. आता ते अधिक संवेदनशील बनले आहे. प्लेट तुटल्यास जमिनीचा आकार, नद्यांची दिशा आणि पर्वतांची स्थिती देखील बदलू शकते. जमिनीची उंची आणि रचनेतील बदल देखील मान्सून आणि हवामान चक्रांवर परिणाम करू शकतात.
दिल्ली, देहरादून, गुवाहाटी किंवा शिलाँग सारखी मोठी शहरे अशा भागात आहेत जिथे सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे असेल. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याचा अर्थ वेळ संपत आहे परंतु याबाबत कृती करणे आवश्यक आहे. भारतावर सतत देखरेखीची आवश्यकता आहे. यासोबतच, भूकंप सुरक्षा मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासोबतच, जनतेनेही या परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.