Marathi News> भारत
Advertisement

RBI च्या नव्या रिपोर्टने वाढवली चिंता! बँक कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा खुलासा

RBI Report: वाढत्या टेक्नोलॉजीमुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात RBI ने र‍िपोर्ट जाहीर केला आहे.

RBI च्या नव्या रिपोर्टने वाढवली चिंता! बँक कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा खुलासा

Bank Clerks: सार्वजनिक आणि खासगी बँकेच्या संदर्भात भारतीय रिझर्व बँकेने (Reserve Bank of India) एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार, बँकेच्या डिजीटलायजेशनमुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या क्लर्कची संख्या हळू-हळू कमी होऊ लागली आहे. टेक्नोलॉजीच्या वापरामुळे बँकेशी संबंधीत कागदपत्रे देखील मोठ्या प्रमाणात डिजीटल पद्धतीने साठवले जातात आणि यामुळे खातेदारांचं बँकेत जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. ऑनलाईन पद्धतीने कामकाज करण्याकडे खातेदारांचा आणि बँकेतल्या व्यवस्थेचा कल असल्याने बँकेमध्ये हळू-हळू क्लर्कच्या संख्येत घट झाली आहे.

सध्याची आकडेवारी 22 टक्क्यांवर पोहोचली

देशातल्या बँकेमध्ये 90च्या दशकात क्लर्कची संख्या 50% पेक्षा जास्त होती. सध्याच्या घडीला ही आकडेवारी 22% झाली आहे. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) याबद्दलची माहिती बँक रोजगार डाटाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. बँकेमध्ये वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या अकडेवारीमध्ये घसरण झाली आहे.

बँकेच्या रांगेमध्ये घट झाली

कागदपत्रे तयार करणे, अधिकऱ्यांना मदत करणे, टेलर, कॅशिअर यांप्रकारची कामे क्लर्कला करावी लागतात. बँकेमध्ये वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्लर्कवर अवलंबून असणारं काम कमी झालं आहे. त्याचबरोबर, बरीच कामे ही स्मार्टफोनच्या मदतीने करता येत असल्याने बँकेच्या बाहेर दिसणाऱ्या लांब रांगेमध्ये देखील घट झाली आहे.

क्लर्कच्या भूमिकेत बदल

ऑटोमेशनमुळे (Automation) बँकेमध्ये काम करणाऱ्या क्लर्कची भूमिका आधीसारखी न राहता ती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. सध्याच्या काळात कोणत्याही फाईलला ट्रान्सफर (File Transfer) करण्यासाठी कागदी कारवाई करण्याची गरज लागत नाही. बँकेमध्ये काम करणाऱ्या क्लर्कच्या (Bank Clerks) संख्येत घट होत असल्यने बँक यूनियनकडून (Bank Union) यासाठी विरोध केला जातोय. बँक यूनियनच्या मते, बँक क्लर्कच्या नियुक्तीवर कमी पैसै खर्च केले जातात.

Read More