Marathi News> भारत
Advertisement

स्फोटानं हादरलं लुधियाना कोर्ट, 2 जणांनी गमवला जीव 3 जखमी

या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की आजूबाजूच्या इमारतींनाही मोठा हादरा बसला. 

स्फोटानं हादरलं लुधियाना कोर्ट, 2 जणांनी गमवला जीव 3 जखमी

लुधियाना : पंजाब विधानसभा निवडणुकीआधी सर्वात मोठी बातमी येत आहे. लुधियानाच्या न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. लुधियानाच्या न्यायालय परिसरातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. 

या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की आजूबाजूच्या इमारतींनाही मोठा हादरा बसला. अनेक लोक घाबरून बाहेर आले. दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पाहून गोंधळ उडाला. स्फोटामध्ये दोन व्य़क्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 3 जखमी आहेत.

जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि आपत्कालिन विभागाकडून बचावकार्य सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्फोटाप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

स्फोटामुळे इमारतीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटानं धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. स्फोट झाला त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. 

Read More