Marathi News> भारत
Advertisement

खातेधारकांच्या मेहनतीच्या पैशांवर महिला बँक कर्मचाऱ्याचा डल्ला; कोट्यवधी रुपयांचं केलं काय? धक्कादायक सत्य उघड

Bank News : 41 खातेधारकांच्या खात्यांतून रक्कम काढली आणि... बड्या बँकेतील महिला कर्मचाऱ्याचा कारनामा. तिनं नेमकं काय केलं? वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.   

खातेधारकांच्या मेहनतीच्या पैशांवर महिला बँक कर्मचाऱ्याचा डल्ला; कोट्यवधी रुपयांचं केलं काय? धक्कादायक सत्य उघड

Bank News : देशभरात सरकारी अख्तयारित येणाऱ्या आणि खासगी वर्तुळात राहून कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँका अस्तित्वात असून, या बँकांमध्ये मोठ्या संख्येनं सामान्य नागरिकांनी  मेहनतीनं पैसा साठवल्याचं पाहायला मिळतं. याच बँकामध्ये पैसे जपून ठेवण्याशिवाय विविध आर्थिक योजना, कर्ज आणि तत्सम सुविधांचा उपभोगही खातेधारकांना घेता येतो. मुळात बँक आणि खातेधारक यांच्यामध्ये विश्वासार्हतेचं नातं असतं. मात्र, याच नात्याला क्षती पोहोचवणारी एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. 

महिला बँक कर्मचाऱ्याकडून खातेधारकांच्या पैशांवर डल्ला 

राजस्थानातील कोटा शहरात असणाऱ्या आयसीआयसीआय (ICICI ) बँकेच्या डिसीएम शाखेतून एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या बँकेतील रिलेशनशिप मॅनेजरपदी काम करणाऱ्या साक्षी गुप्ता नावाच्या एका महिला कर्मचाऱ्यानं खातेधारकांच्याच पैशांवर डल्ला मारला. उपलब्ध माहितीनुसार साक्षईनं 41 खातेधारकांच्या 110 हून अधिक खात्यांमधून 4 कोटीं 58 लाखांहून अधिक रत्तम काढून ती शेअर बाजारात गुंतवली. या संपूर्ण घोटाळ्यासाठी तिनं खातेधारकांचे मोबाईल क्रमांकसुद्धा बदलले, जेणेकरून या व्यवहाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. हा संपूर्ण घोटाळा उघजकीस आल्यानंतर पोलिसांनी 31 मे 2025 ला साक्षीवर अटकेची कारवाई केली. 

बँकेच्या डिसीएम शाखेचे व्यवस्थापक तरुण दाधीच यांनी फेब्रुवारी महिन्यातच यासंदर्भातील तक्रार पोलिसांत दाखल केली होती. ज्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर साक्षीविरोधातील कारवाई केली. ज्यानंतर तिला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून आता या घोटाळ्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचाच शोध पोलीस घेत आहेत. 

खातेधारकांच्या जीवावर शेअर बाजारात गुंतवणूक 

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार साक्षी गुप्तानं 2020 ते 2023 दरम्यान हा घोटाळा केला. 31 खातेधारकांच्या एफडी वेळेआधीच तोडत 1 कोटी 34 लाख 90 हजार 254 रुपये बनावट खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. याशिवाय तिनं 3 लाख 40 हजारांचं बनावट खासगी कर्जही घेतलं. साक्षीनं बहुतांश व्यवहार हा इन्स्टा किओस्त आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांच्या माध्यमातून केला. चार खातेधारकांचं डेबिट कार्ड वापरून तिनं एटीएम (ATM) आणि इंटरनेट बँकिंगचेही (Net Banking) व्यवहार केल्याचं उघडकीस आलं. 

फक्त बँकेतील खातेधारकच नव्हे, तर साक्षीनं कुटुंबीयांचाही पैसा शेअर बाजारात गुंवतला. कुटुंबाकडून घेतलेले 40 ते 50 लाख रुपये तिनं शेअर बाजारात गुंतवले, मात्र या व्यवहारामध्ये तिनं मोबाईल क्रमांक बदलून ओटीपी आणि अलर्ट ब्लॉक केले. ज्यामुळं कोणालाही या व्यवहाराची कल्पना आलीच नाही. साक्षीनं खातेधारकांकडून मोबाईल क्रमांक बदलण्यासाठीचे फॉर्म भरून घेत त्यात कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक जोडले. ज्यामुळं खातेधारकांना कोणत्याही व्यवहाराची सूचना मिळाली नाही. Pool Account प्रमाणं तिनं या खात्यांचा वापर करत त्यातील रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये टाकली. 15 फेब्रुवारी रोजी जेव्हा एका ज्येष्ठ नागरिक महिला खातेदाराच्या खात्यातून 3 कोटी 22 लाख रुपये काढले गेले तेव्हा बँकेला या गैरव्यवहाराची कुणकुण लागली आणि तपासाची चक्र फिरली. 

 

 

Read More