Marathi News> भारत
Advertisement

पोलखोल! LAC वर गोळीबार चीनकडूनच

भारताकडून देण्यात आली मोठी माहिती 

पोलखोल! LAC वर गोळीबार चीनकडूनच

नवी दिल्ली : सोमवारी पुन्हा एकदा India china भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर आली ज्यानंतर या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमावादाचा मुद्दा आणखी चिघळत असल्याचं पाहायला मिळालं. भारतीय सैन्यानं LAC ओलांडत गोळीबार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता. पण, भारताकडून असं कोणतंही कृत्य केलं गेलं नसल्याची स्पष्ट माहिती आता देण्यात आली आहे. 

७ सप्टेंबरच्या रात्री चीनच्या सैन्याकडूनच भारतीय सैन्याला चिथवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य म्हणजे भारताकडून गोळीबार करण्यात आला नसल्याची महत्त्वाची माहिती भारताच्या संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे. 

एका अधिकृत निवेदन पत्रातून ही बाब मांडण्यात आली. ज्यामध्ये चीनकडून वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. चिनी सैनिकांनीच भारत्या फॉरवर्ड पोस्टवर येण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना रोखलं. त्याचवेळी चीनच्या सैन्याकडून हवेत गोळीबार करण्याच आल्याची माहिती यात देण्यात आली आहे.

fallbacks

 

दरम्यान, चीनकडून गोळीबार होत असतानाही भारतीय सैन्यानं या कृत्याची पुनरावृत्ती केली नसल्याची स्पष्ट माहिती निवेदनातून मांडण्यात आली. शिवाय चीनकडून देण्यात आलेलं निवेदन हे दिशाभूल करणारं असल्याचा आरोपही भारताकडून लावण्यात आला आहे. 

 

Read More