Marathi News> भारत
Advertisement

बस 200 मीटर दरीत कोसळून मोठी दुर्घटना, 20 जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना, 20 जणांचा मृत्यू; शालेय विद्यार्थीही या बसने करत होते प्रवास

बस 200 मीटर दरीत कोसळून मोठी दुर्घटना, 20 जणांचा मृत्यू

हिमाचल : घरातून शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांवर मृत्यूने झडप घातली. रस्त्यात मृत्यू काळ बनून आला आणि सगळंच संपलं. रस्त्यावर स्कूलबसचा भीषण अपघात झाला. या अपघातात शाळेतील विद्यार्थ्यांसह 20 लोकांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

ही बस दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये काही विद्यार्थी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. ही धक्कादायक घटना हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळाली आहे. 

कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सेंजला जाणारी बस सकाळी 8.30 वाजता जंगला गावाजवळ बस दरीत कोसळली. कुल्लू जिल्ह्यातील अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. 

fallbacks

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या बसमधून किती लोक प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. हा अपघाताचं कारणही नेमकं समजू शकलं नाही. 

Read More