Marathi News> भारत
Advertisement

EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार 'इतके' टक्के व्याज

PF Interest Rate:देशातील EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार 'इतके' टक्के व्याज

EPFO Interest Rate : EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने भविष्य निर्वाह म्हणजे PF वरील व्याजदराबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम देशातील 7 कोटींहून अधिक लोकांवर होणार आहे. स्वीकृत व्याजदरला अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविले होते, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. (Big update for 7 crore EPFO ​​subscribers Now you will get 8 25 percent interest on PF Interest Rate)

केंद्र सरकारने ईपीएफओने प्रस्तावित केलेल्या व्याजदराला मान्यता दिल्यामुळे पगारासोबतच, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.25 टक्के दराने व्याज उपलब्ध असेल. 2023-24 या आर्थिक वर्षातही हाच व्याजदर होता, शेवटचे पीएफचे व्याजदर 2022-23 मध्ये बदलण्यात आला होता. तेव्हा तो 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला होता. 28 फेब्रुवारी रोजी, ईपीएफओने 2024-25 आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.25 टक्के व्याज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 7 कोटींहून अधिक लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. 

अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालयाने व्याजदरांबाबत माहिती दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 28 फेब्रुवारी रोजी ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पीएफच्या व्याजदराबाबत निर्णय घेण्यात आला आणि तो 8.25 टक्के ठेवण्यात आला. आता त्याला अर्थ मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. 

Read More