Marathi News> भारत
Advertisement

Crime News : धक्कादायक सासरी गेलेल्या जावाईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं...पाश्वभागात घातला ग्लास

Crime News: भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली, तिला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. पीडित तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे

Crime News : धक्कादायक सासरी गेलेल्या जावाईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं...पाश्वभागात घातला ग्लास

Bihar Crime News : पत्नीला आणायला गेलेल्या जावयाला सासरी बेशुद्ध होईपर्यंत मारलं, इतकंच नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टिलचं ग्लास टाकला. पीडित तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी याबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाची पत्नी सासरी गेली, ती परत नांदायल येत नसल्याने पीडित तरुण तिला आणायला सासरी गेला. पण पत्नीला परत पाठवण्याऐवजी सासरच्या लोकांनी जावयालाच बेशुद्ध होईपर्यंत मारलं. 

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित तरुण हा साहेबगंज इथे राहणार आहे. मारहाणीनंतर पीडित तरुण आपल्या घरी आला आणि त्याच अवस्थेत तो डॉक्टरांकडे गेला. त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टिलचं ग्लास टाकण्यात आलं होतं, ऑपरेशननंतर ते ग्लास काढण्यात आलं. 

पीडित तरुणाचं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण पाच वर्षात काही महिनेच पत्नी सासरी राहिली आणि त्यानंतर ती माहेरी गेली. तिच्या पर्समधून एका मुलाचा फोटो पीडित तरुणाला सापडला होता. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. भांडणांनंतर पत्नी माहेरी निघून गेली. वारंवार विनंती केल्यानंतरही ती सासरी परतायला तयार नव्हती. त्यामुळे पीडित तरुण तिला आणायला सासरी गेला होता.

हे ही वाचा : जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का

पण सासरच्या लोकांनी आपल्या मुलीला समजवण्याऐवजी जावयालाच दोषी ठरवलं. त्याला काही सांगण्याची संधी न देता मारहाण सुरु केली. या मारहाणीत तरुण बेशुद्ध पडला. पण सासरच्या निर्दयी लोकांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली. इतकंच नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टिलचं ग्लास टाकलं. या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

Read More