Marathi News> भारत
Advertisement

बाईक अपघातानंतर तरुण करु लागला विचित्र प्रकार, पाहून सर्वांनाच धक्का; पाहा व्हिडीओ

एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही धडक इतकी वेगवान होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला.

बाईक अपघातानंतर तरुण करु लागला विचित्र प्रकार, पाहून सर्वांनाच धक्का; पाहा व्हिडीओ

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. येथे आपल्या इतके मनोरंजक आणि आश्चर्यकारक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे लोकांना तासनतास तेथे थांबवून ठेवत आहेत. म्हणून तर जर एखादी व्यक्ती सोशल मीडियावर आली तर तेथे त्याचा वेळ कसा जातो हे, त्याचं त्याला कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या व्हिडीओत दिसणाऱ्या एका भीषण अपघाताने सर्वांनात मोठा धक्का बसला आहे. परंतु त्यानंतर जे घडलं, ते पाहून लोकांना आणखी मोठा धक्का बसला.

एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही धडक इतकी वेगवान होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला. एवढेच नाही तर त्याच्या दुचाकीचे काही भाग रस्त्यावर तुकडे-तुकडे होऊन पडले. तुम्ही पण हा खतरनाक व्हिडीओ एकदा पाहा...

खरंतर एखादा अपघात झाली की, त्या चालकाला धक्का बसतो. पण या तरुणानं वेगळाच प्रकार केला. या तरुणाचा इतका मोठा अपघात झाला, तरी देखील हा तरुण उभा राहून रस्त्यावर नाचू लागला, ज्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला.

हा तरुण असा का नाचू लागला, हे लोकांना कळलं नाही. परंतु लोक याला बघून थक्कं झाले आहेत.

आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि 15 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे.

Read More