Marathi News> भारत
Advertisement

भारत-रशिया दरम्यान एस ४०० क्षेपणास्र खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

या करारामुळं भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण विषयक संबंध आणखी वृद्धिंगत झालेत

भारत-रशिया दरम्यान एस ४०० क्षेपणास्र खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : एस ४०० क्षेपणास्त्र खरेदीबाबतच्या करारावर अखेर भारत आणि रशिया यांच्यात शिक्कामोर्तब करण्यात आलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये शिखर बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकेचा विरोध डावलून एस ४०० क्षेपणास्त्र खरेदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

मोदी आणि पुतिन यांनी संयुक्त निवेदन जारी करून प्रसार माध्यमांसमोर याबाबतची माहिती दिली. या करारामुळं भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण विषयक संबंध आणखी वृद्धिंगत झालेत.

त्याशिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण करारांवरही उभय देशांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील या करारावर अमेरिकेसह अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय.

हा करार झाल्यानं आता चीन आणि पाकिस्तान यांना योग्य संदेश जाईल, अशी अपेक्षा आहे.

Read More