मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एका नववधूचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे, जी प्री-वेडिंग शूटसाठी जिममध्ये पोहोचली होती. व्हिडीओ आयपीएस रुपिन शर्मानेही आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्याने लिहिले- प्री वेडिंग शूट.
प्री वेडिंग शूटचा हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Pre-wedding shoot...
— Rupin Sharma IPS (@rupin1992) November 19, 2021
Aaj raaz khula himmat ka....... pic.twitter.com/1d9bJDVMqa
व्हायरल होत असलेल्या अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, प्री-वेडिंग शूटसाठी वधू जिममध्ये पोहोचली आणि व्यायाम करू लागली. विशेष म्हणजे यादरम्यान तिने जड डंबेलही उभे केले, जे पाहून आश्चर्यही वाटते.
व्हिडीओच्या दुसऱ्या फ्रेममध्ये वधू पुन्हा एकदा व्यायाम करताना दिसत आहे. तिसर्या फ्रेममध्ये सगळ्यात मजा येते ती नववधूला व्यायाम करताना पाहण्यात. प्री-वेडिंग शूटसाठी जिथे मुले आणि मुलींना डोंगराळ भागात जायला आवडते, त्याउलट, वधूने जिम निवडले. इन्स्टाग्राम, फेसबुक या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.