Marathi News> भारत
Advertisement

राहुल गांधींवर 'वंदे मातरम' चा अपमान केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

 भाजपातर्फे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आणण्यात आलाय.

राहुल गांधींवर 'वंदे मातरम' चा अपमान केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि कॉंग्रेस दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येतेय तसतसा विरोधकांना नामोहरण करण्याच्या हरएक क्लृप्ती वापरण्यात येत आहेत. भाजपातर्फे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आणण्यात आलाय. राहुल गांधीनी 'वंदे मातरम' चा अपमान केल्याचा दावा भाजपाने केलाय. एका निवडणुक रॅलीत राहुल गांधी 'वंदे मातरम' एका लाइनमध्ये संपविण्यास सांगत आहेत. कर्नाटक कॉंग्रेस नेता वेणुगोपाल यांना आपल घड्याळ दाखवत वंदे मातरम एका लाइनमध्ये संपवाव अस राहुल गांधी म्हणताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कॉंग्रेसकडून प्रतिक्रीया नाही 

 हा व्हिडिओ खरा असला तरी संपूर्ण नाहीए.

भाजपा आयटी सेलचे अमित मालवीय यांनी 'वेल डन राहुल गांधी' असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेयर केला होता.

त्यानंतर कर्नाटक भाजपाने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेयर केला. दरम्यान, या व्हिडिओवर कॉंग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. 

Read More