Marathi News> भारत
Advertisement

भाजप नगरसेवक तुषार हिंगे वॉंटेड घोषित

   भाजप नगरसेवक तुषार हिंगेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजप नगरसेवक तुषार हिंगे वॉंटेड घोषित

पिंपरी-चिंचवड :   भाजप नगरसेवक तुषार हिंगेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

३० सप्टेंबर २०१७ रोजी  महेश नारायण गारूळे (४८) आणि कालिदास गाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा आरोप तुषार आणि त्यांच्या साथीदारांवर आहे. 

साडेतीन महिन्यांपासून गायब 

 याप्रकरणातील २० जणांवर गुन्हा दाखल झाला.  यातील ४ जणांनाच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

दरम्यान हिंगे यांच्यासह ११ आरोपी साडेतीन महिन्यांपासून गायब असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

राजकीय दबाव 

 दरम्यान पोलिसांनी  नगरसेवक तुषार हिंगें यांच्यासह ११ जणांना वॉंटेड घोषित केले आहे.

त्यांनी अद्यापही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला नसल्याचेही समोर आले आहे. राजकीय दबावामूळे हिंगे यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. 

Read More