Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक निवडणुकीची तारीख भाजपला कळल्याने निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यानं ट्विटरवर तारखा जाहीर केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय. 

कर्नाटक निवडणुकीची तारीख भाजपला कळल्याने निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यानं ट्विटरवर तारखा जाहीर केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतलीय. यासंदर्भात निवडणूक आयोगाची बैठक सुरू असून कारवाईसंदर्भात चर्चा सुरू आहे. डेटा चोरीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटलेला असताना भाजपचे  आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आज एका नव्या वादात अडकले आहेत. 

भाजपकडून आधी तारीख जाहीर, नंतर निवडणूक आयोगाकडून

अमित मालवीय यांनी काल ट्विटरवर कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर करून टाकल्या. १२ मे रोजी मतदान आणि १८ मे रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा मालवीय यांनी केली. यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच कर्नाटक निवडणुकीचा कार्यक्रम भाजपला कळला होता की काय, असा सवाल निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. त्यावर तारखा फुटल्या असतील तर कठोर कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं. 

fallbacks

 कर्नाटकात आचार संहिता लागू

कर्नाटक विधानसभेसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार असून येत्या १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. दिल्लीत निवडणूक आयोगानं याविषयीची घोषणा केली. येत्या २८ मे रोजी कर्नाटक विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे आजपासून कर्नाटकात आचार संहिता लागू झालीय. 

Read More