Marathi News> भारत
Advertisement

सरदार पटेलांच्या जयंतीबाबत दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक

३१ ऑक्टोबरला देशभरात सरदार पटेल यांची साजरी केली जाणार आहे.

सरदार पटेलांच्या जयंतीबाबत दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : सरदार पटेलांच्या जयंतीबाबत दिल्लीत भाजपची आज महत्त्वाची बैठक आहे. जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ३१ ऑक्टोबरला देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणारे आहे. गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ यू्निटजवळ मुख्य कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याआधी गृह मंत्रालयानं सीआरपीएफ, बीएसएफसह केंद्रीय सुरक्षा दलांना आपापल्या कार्यालयात सरदार पटेलांचा फोटो लावण्याचे निर्देश होते. 

सरदार पटेल यांची 31 ऑक्टोबरला जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं जय्यत तयारी देखील केली आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला देशाचा अभिन्न भाग बनवल्यामुळे गृह मंत्रालयाने स्टॅच्यू ऑफ युनिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

गृह मंत्रालयाकडून एकता दिनाची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातील हजारो लोकं सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

देशात पहिल्यांदा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी नंतर एकता दिवसाचं आयोजन केलं जाणार आहे. कार्यक्रमा दरम्यान सरदार पटेल राष्ट्रीय एकता अवार्डचं देखील वितरण करण्यात येणार आहे.मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.

सरदार पटेल नॅशनल युनिटी पुरस्कार हा कमळाच्या पानांच्या आकाराचा असेल. पुरस्काराची लांबी 6 सेंटीमीटर, रुंदी 2 ते 6 सेमी पर्यंत असेल. चांदी आणि सोन्याचा वापर करुन हा पुरस्कार बनवला जाईल. या पुरस्कारावर सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असं लिहिलेलं असणार आहे.

Read More