Marathi News> भारत
Advertisement

भाजप खासदाराने असं काही म्हटलं की, काँग्रेसचे खासदार भडकले

त्या भाजप खासदारावर भडकले काँग्रेसचे खासदार

भाजप खासदाराने असं काही म्हटलं की, काँग्रेसचे खासदार भडकले

नवी दिल्‍ली : लोकसभेत मोदी सरकार विरुद्ध अविश्‍वास ठराव मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरु असताना भाजपकडून सर्वात आधी  मध्‍यप्रदेशच्या जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं की, '48 वर्षामध्ये काँग्रेसने देशात स्कॅमचं (घोटाळा) राजकारण केलं. तर 48  महिन्यात आम्ही स्‍कीमचं राजकारण केलं. देशात गरीबी नाही संपली पण गरीब मुख्यधारेतून बाजुला झाला.

राकेश सिंह यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

- देशात अनेकदा अविश्वास ठराव आले. पण यंदाचा ठराव सगळ्यात वेगळा आहे.

- अविश्‍वास ठराव आणण्याचं काणतंही ठोस कारण नाही.

- आज काँग्रेस अविश्‍वास ठरावाचं समर्थन करते आहे यापेक्षा अधिक दुर्भाग्‍य काही असू शकतो.

- गल्‍लाजी तुम्ही स्वतः शापित झाले. जेव्हा तुम्ही काँग्रेस सोबत उभे राहिले.

- कुमारस्‍वामींना संपूर्ण देशाने रडतांना पाहिलं. मला नाही माहित की, या अविश्वास ठरावासोबत उभ्या आणखी किती पक्षांना हे विष प्यावं लागणार आहे.

- बहुमताने बनलेल्या या सरकार विरोधात राजकीय पक्षाकडून अविश्वास ठराव येणं हे सिद्ध करतं की, आज काँग्रेसला एका परिवाराच्या सरकार शिवाय अजून कोणत्याही सरकारचा स्विकार नाही.

- हा अविश्‍वास ठराव देश नाही समजू शकला.

- हा अविश्‍वास ठराव 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विजयचा प्रवास रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे.

- खरगेजींना या परिवारामुळेच कर्नाटकात मुख्‍यमंत्रीपदाचा चेहना नाही होता आलं.

Read More