Marathi News> भारत
Advertisement

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चढाओढ

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. 

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चढाओढ

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. 

राज्याच्या कोट्यातल्या सहा जागा रिक्त होणार आहेत. संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळं आता या तीन जागांसाठी कुणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता आहे.

नारायण राणेंसह केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, सहसंघटनमंत्री मुकुल कानिटकर आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांच्या नावांची या जागांसाठी चर्चा आहे. 

नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर इतर दोन जागांसाठी पाच जणांची नावं चर्चेत आहेत. भाजपच्या संसदीय बोर्डाची आज रात्री उशिरा बैठक आहे.

राज्यसभा खासदार उमेदवारांबाबत चर्चा होणार असून  निवडीचे सर्व अधिकार केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांना देण्यात येणार आहेत. 

Read More