Marathi News> भारत
Advertisement

तर याप्रमाणे राज्यसभेत BJP होणार सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसचं मोठं नुकसान

बहुमत नसलेले तीन तलाक बिल राज्यसभेत पास होऊ शकले नाही. 

तर याप्रमाणे राज्यसभेत BJP होणार सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसचं मोठं नुकसान

मुंबई : बहुमत नसलेले तीन तलाक बिल राज्यसभेत पास होऊ शकले नाही. 

लोकसभेत ज्या बिलला काँग्रेसने सपोर्ट केलं तोच पक्ष बहुमत नसल्यामुळे या बिलच्या विरोधात उभी राहिली. आणि भाजपच्या तीन तलाक बिलाला पास होऊ दिले नाही. मात्र आता यापुढे असं होणार नाही कारण 

लोकसभेत बहुमत असलेला भाजप हा पक्ष एप्रिलमध्ये राज्यसभेत देखील बहुमत मिळणार आहे. एप्रिलमध्ये राज्यसभेत 55 सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. यामध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांमध्ये बीजेपीला सहा जागांचा फायदा होणार आहे. आणि काँग्रेसला चार जागांपासून मुकावं लागणार आहे. विशेष तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 8 सदस्य आणि अन्य 21 सदस्य जिंकून येऊ शकतो. 

एप्रिलमध्ये 55 सदस्य होणार रिटायर 

राज्यसभेमध्ये एप्रिलमध्ये बदल होणार आहे. 55 सदस्यांचा कार्यकाल संपणार आहे. एप्रिलमध्ये ज्यांचा कार्यकाल संपत आहे यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री अरूण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेता प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी तसेच सचिन तेंडुलकरचा देखील समावेश आहे. यावेळी राज्यसभेत भाजपचे 58 सदस्य, काँग्रेसचे 57 सदस्य.

यूपी आणि महाराष्ट्रातून मिळणार हा फायदा 

उत्तर प्रदेशच्या सध्याच्या स्थितीनुसार राज्यसभेच्या या राज्यातून 9 जागा खाली होत आहे. यामध्ये सात जागा भाजपला मिळत आहे. आणि दोन अपक्षांना मिळू शकतात. हरियाणातून खाली झालेली एक जागा भाजपला मिळणार आहे. मध्य प्रदेशच्या पाच जागांमधून भाजपला चार आणि काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. आंध्र प्रदेशमधील 3 जागांपैकी 2 टीडीपी आणि एक अपक्ष म्हणून मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या सहा जागांपैकी 2 जागा भापला एक शिवसेनेला आणि 1 काँग्रेसला 1 राकांपाला मिळणार आहे. राज्याच्या सहाव्या जागेवरून मोठी टक्कर सुरू आहे. कर्नाटकच्या चार पैकी 3 जागा काँग्रेसला आणि अन्य ला मिळणार असून 1 जागा भापला मिळणार आहे. 

Read More