Marathi News> भारत
Advertisement

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दोघंही लवकरच वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेककडून किंवा बच्चन कुटुंबियांकडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता अमिताभ बच्चन यांनी स्वत: ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोट निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोजीपती 16' या कार्यक्रमांच सूत्रसंचालन करत आहेत. 11 ऑक्टोबरला बिग बी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा खास दिवस कौन बनेगा करोडपती 16 च्या सेटवरही सेलिब्रेट करण्यात आला. या दरम्यान अमिताभ यांना शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ स्क्रिनवर चालवण्यात आला. यात बच्चन कुटुंबियांकडून स्पेशल मेसेजसह वाढिदवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 

व्हिडिओमधून ऐश्वर्या गायब
कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर एका स्क्रिनवर शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ चालवण्यात आला. या व्हिडिओत बच्चन कुटुंबियांमधील सर्वजण होते. पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नंदा नवेली यांनी शुभेच्छा दिया. बिग बी यांची नात आराध्या बच्चनचेही काही फोटोंचा या व्हिडिओत समावेश होता. पण संपूर्ण व्हिडिओत ऐश्वर्या रॉय कुठेच दिसली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट निश्चित असल्याचा दावा केला आहे. 

 

हेसुद्धा वाचा - ऐश्वर्या - अभिषेकच्या कथित भांडणासाठी 'ही' अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

 

ऐश्वर्या रॉयने 11 ऑक्टोबरला रात्री उशीरा अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट एक यूजरने रेडिटवर शेअर केली. पण व्हिडिओत ऐश्वर्या रॉय गायब असल्याने चाहत्यांच्या मनात शंकेचे पाल चुकचुकली. एका युजरने पोस्ट शेअर करत म्हटलंय 'कुणी केबीसीचा आजचा एपिसोड पाहिला आहे का, वेगेळं होण्याचं जवळपास निश्चित आहे. व्हिडिओत ऐशची एकही झलक नाही'

fallbacks

अनंत अंबानीच्या लग्नातही ऐश्वर्या एकटीच
उद्योगपती मुकेश अंबानीचा यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातही ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबियांबरोबर नव्हते. अमिताभ बच्चन, जया बच्चन हे वेगळे होते, तर ऐश्वर्या आणि आराध्या वेगळे दिसले. अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. पण यावर दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Read More