Boy Making Instagram Reel Beaten: पानीपतमधील एका प्रसिद्ध बाजारामध्ये महिलांचे कपडे परिधान करुन अश्लील डान्स करणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागत पडल्याचा प्रकार घडला आहे. दुकानांसमोर अश्लील डान्स करणाऱ्या या तरुणाला दुकानादारांनी चोप दिला असून त्याला झालेल्या या मारणाहीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण रील बनवण्यासाठी बाजारामध्ये व्हिडीओ शूट करत असतानाच हा सारा प्रकार घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पानीपतमधील गजबजाट असलेला बाजारात हा सारा प्रकार घडला. याच ठिकाणी एक तरुण रील शूट करण्यासाठी आपल्या एका मित्रबरोबर आला होता. या तरुणीने शर्ट काढून अर्धनग्नावस्थेत व्हिडीओ शूट करु लागला. या तरुणीने शर्ट काढलं होतं आणि तो छातीवर महिलांचा ब्रा घालून व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. त्याला पाहून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अवघडल्यासारखं झालं. त्यानंतर दुकानदारांनी आणि स्थानिकांनी या तरुणाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता. अखेर काही दुकानादारांबरोबर झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. दुकानादारांनी या तरुणाला पकडून हे तू काय करत आहेस? असा जाब विचारत त्याच्या कानाखाली लागवल्याचं व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
या तरुणाला दुकानादारांनी पुन्हा इथे दिसू नकोस असं सांगून पळवून लावलं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलेलं नाही. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधी दुकानादारांनी प्रेमाने या तरुणाकडे नेमकं तू काय करत आहेस अशी चौकशी केली. त्यावर या तरुणीने आपण सोशल मीडियासाठी रिल्स शूट करत आहोत, असं सांगितलं. आपण यापूर्वीही अनेक व्हिडीओ बनवल्याचं त्याने दुकानादारांना सांगितलं. सोशल मीडियावर माझे व्हिडीओ फार व्हायरल होतात असा या तरुणाच दावा होता. मात्र त्याने अश्लील डान्स करत सुरु केलेल्या शुटींगवर स्थानिकांनी, दुकानांनी आक्षेप घेतला असता त्यांच्याच बाचाबाचीनंतर हाणामारी झाली. याच हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
1)
आजकल लोग Instagram reels बनाने के लिए कुछ भी करने को तैयार हो जाते हैं।
— Radhe Meena (@Radhemahwa) November 26, 2024
आज हरियाणा में एक Instagram reels बनाने के लिए एक लड़का लड़की बनकर नग्न अवस्था में बाजार में घुम रहा था तो लोगों में चाटें बरसा दिए।
क्या इन इंस्टा के नग्न लड़के लड़कियों के साथ यही होना चाहिए ?? pic.twitter.com/240akzq4Pr
2)
इन छापरी टाइप लोगों ने देश को समझ क्या रखा है ।
— Manvendra Pandav (@ManvendraPandav) November 26, 2024
जहां चाहते हैं वहां गंद फैला रखी है ।
इन्हें शर्म नहीं आती ये क्या चाहते हैं।
केवल रील के लिए जैसा चाहे वैसा नंगापन फैला रखा है ।
इनके साथ कड़ी कानूनी कार्रवाई होनी चाहिए।
देश एक समाज है और समाज में विकृति पर बर्दाश्त नहीं… pic.twitter.com/wzV6c9Si4K
या तरुणाने शेवटी दुकनादारांसमोर हात जोडून माफी मागितली. आपली चूक झाली. भविष्यात माझ्याकडून असं काहीही होणार नाही, असा शब्द या तरुणाने दिला. त्यानंतर दुकानादारांनी हे असे अश्लील व्हिडीओ करणं चांगलं नसल्याचं सांगितलं आणि त्याला समज देऊन सोडून दिलं.