Marathi News> भारत
Advertisement

Viral News : गर्लफ्रेंडच्या अशा मागणीसाठी, कपडे न घालताच पोहोचला बॉयफ्रेंड, पोलिसांनी पकडल्यावर...

Naked Thief Bangalore : बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिथे एका दुकानात चोरी करण्यासाठी आलेला चोर विवस्त्र अवस्थेत सीसीटीव्हीत कैद झाला. या चोरीमागील कारण तुम्हाला कळल्यास हसू आवरणार नाही.   

Viral News : गर्लफ्रेंडच्या अशा मागणीसाठी, कपडे न घालताच पोहोचला बॉयफ्रेंड, पोलिसांनी पकडल्यावर...

Naked Thief Bangalore : तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. झालं असं की, ती एक शांत रात्र होती, रस्ते शांत होते, रस्त्यांवर कोणतीही हालचाल नव्हती. पण एका मोबाईल दुकानाच्या भिंतीमागे काहीतरी घडत होते, ज्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. हे चित्रपटातील दृश्य नव्हते तर एक वास्तव होते जिथे एक चोर चोरी करण्यासाठी नग्न अवस्थेत दुकानात घुसला होता. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात. 

बेंगळुरूच्या होंगासंद्रा येथील हनुमान टेलिकॉम परिसरातून चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जिथे एक चोर विवस्त्र अवस्थेत तोंडावर मास्क घालून चोरी करायला आला होता. पोलिसांनी आरोपीची ओळख 27 वर्षीय इम्रान उल्लाह अशी केली आहे. जो आसामचा रहिवासी आहे. आरोपीने सांगितले की त्याने त्याचे कपडे काढले आणि चोरी केली कारण त्याचे कपडे नवीन होते आणि त्याला ते खराब करायचे नव्हते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यामध्ये आरोपी नग्न, हातात टॉर्च आणि तोंडावर मास्क घालून चोरी करण्यासाठी दुकानात घुसल्याचे दिसून आले.

राजस्थानमध्ये कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे चोरीच्या वेळी दुकान मालक दिनेश उपस्थित नव्हता. पण तो दररोजप्रमाणे त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ऑनलाइन निरीक्षण करत होता. जेव्हा त्याने दुपारी 4 वाजता फुटेज तपासले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्याने ताबडतोब स्थानिक पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान उल्लाहने चौकशीदरम्यान सांगितले की, तो त्याचे नवीन कपडे वाचवण्यासाठी कपड्यांशिवाय दुकानात शिरला होता, त्याला दुकानाच्या भिंतीत केलेल्या छिद्रातून जावे लागले. पोलीस चौकशीदरम्यान इम्रान उल्लाहने सांगितले की, तो त्याच्या मैत्रिणीसाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने ही चोरी करत होता. तो चोरीला गेलेला फोन काळ्या बाजारात विकणार होता.

त्याने ही चोरीची योजना खूप विचारपूर्वक केली होती. इम्रान उल्लाह एकटा नव्हता. त्याचा एक सहकारी दुकानाबाहेर पहारा देत होता आणि तो स्वतः आत गेला. महागडे फोन निवडून आपल्या बॅगेत भरले. या चोरीच्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 25 लाख रुपये होती. त्याने स्वस्त आणि जुने मॉडेल घेतले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधीच दुकानाची रेकी केली होती आणि त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती आणि दुकानाच्या लेआउटची पूर्ण माहिती होती. पोलिसांनी सांगितले की, इम्रान उल्लाह याआधीही अनेक चोरींमध्ये सहभागी आहे आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि इम्रान उल्लाहच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

Read More