Marathi News> भारत
Advertisement

क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली अन् 'तो' अमानुषपणे...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी तरुणाच्या हाता-पाया पडत आहे. पण तो तरुण तिला अमानुषपणे...  

क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली अन् 'तो' अमानुषपणे...

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या ग्रेटर नोएडा वेस्टमधील गौर सिटी- 2 मधील आम्रपाली गोल्फ होम्स सोसायटीमध्ये एक लज्जास्पद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणाने फ्लॅटच्या बाल्कनीत आपल्या मैत्रिणीवर क्रूरपणे हल्ला केल्याचा या पाहिला मिळते. गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्डचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  ती तरुणी आपल्या जीव वाचविण्यासाठी तिने जीवाच्या आकांताने त्याच्यासमोर हात पाय जोडताना दिसत आहे. पण तरीही तो तरुण तिच्याशी गैरवर्तन करताना दिसून आला. (Boyfriend beats girlfriend on balcony Greater Noida Amrapali Golf Homes viral video)

नेमकं काय घडलं?

ही संपूर्ण घटना समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तो तरुण महिलेशी गैरवर्तन करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

व्हायरल व्हिडीओची दखल घेत, बिसरख पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण इक्बाल याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधम तरुणाचे वय 24 वर्ष असून तो न्यू उस्मानपूर, अरविंद नगर परिसरातील राहणार आहे. तर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.  

मैत्रिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरुणाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ज्याच्या आधारे आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तरुणीने पोलिसांनी झालेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणीची तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करुन कारवाई केली आहे. 

नोएडा पोलीस आयुक्तालयाच्या मीडिया सेलने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, आरोपींविरुद्ध इतर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. 

दुसरीकडे महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्या शिवाय या घटनेनंतर सोसायटीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फ्लॅटमध्ये होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबद्दल लोकांनी चिंता व्यक्त केली आहे आणि अशा घटनांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read More