Marathi News> भारत
Advertisement

त्या ब्रेकअप पत्रात काय आहे असं खास? ज्यामुळे सोशल मीडियावर होतेय चर्चा

जर प्रेयसीकडून धोका मिळाला किंवा तिच्या स्वभावाने त्रस्त असा प्रियकर काय करणार? तर तो त्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करेल. या प्रियकरानेही तिचा सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सांगण्यासाठी या प्रियकराने मस्त शक्कल लढवली. त्याने प्रेयसीला ब्रेकअप पत्र लिहले.

त्या ब्रेकअप पत्रात काय आहे असं खास? ज्यामुळे सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई - प्रेम...जगातील सर्वात सुंदर भावना. म्हणतात प्रेम केलं जात नाही ते होतं. प्रेम खरं असेल तर एकमेकांच्या अनेक भावना न सांगता एकमेकांना कळत असतात. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. प्रेमाची कबुल देताना किंवा प्रियकर प्रेयसीचे अनेक गाण्यांवरील सुंदर असे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर बघतो.

इंस्टाग्रामवर अशाच एका प्रियकराने पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या नेटकरांचं लक्ष वेधत आहे.

जर प्रेयसीकडून धोका मिळाला किंवा तिच्या स्वभावाने त्रस्त असा प्रियकर काय करणार? तर तो त्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करेल. या प्रियकरानेही तिचा सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सांगण्यासाठी या प्रियकराने मस्त शक्कल लढवली. त्याने प्रेयसीला ब्रेकअप पत्र लिहले.

ब्रेकअप पत्राची खासयित
या पत्रात प्रियकर प्रेयसीला म्हणतो, माझी पूर्व गर्लफ्रेंड, 21व्या युगातील माझ्या सारख्या मुलामध्ये आता हिम्मत नाही की तुझ्यासारख्या चालाक मुलीसोबत नातं ठेवण्यात. त्यामुळे मी तुझ्याशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. जर माझं काही चुकं असेल तर मोठा भाऊ म्हणून मला माफ कर. तर पत्राच्या शेवटी लिहिलं आहे, पूर्व बॉयफ्रेंड आणि वर्तमानकाळातील मोठा भाऊ सुजान.

fallbacks

fallbacks

सुंदर अक्षरात लिहिलेलं हे पत्र सध्या सोशय मीडियावर तुफान गाजतं आहे. ब्रेकअपचं पत्र म्हणून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Read More