एक महिलेने आपल्या ताकदीच्या जोरावर तीन चोरांना पळवून लावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना एका ज्वेलर्सच्या घरी झाली आहे. तीन चोर दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एका महिलेने बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर त्या चोरांना पळवून लावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील झपाट्याने व्हायरल झाला आहे. हा सगळा प्रकार पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका ज्वेलर्सच्या घरी घडला आहे.
अमृतसरमध्ये राहणाऱ्या मनम्रीत यांनी सांगितले की, त्या कपडे सुकत घालण्यासाठी गच्चीवर गेलो होतो. तेव्हा त्या महिलेने वरुन पाहिलं की, तिच्या घराबाहेर तीन युवक तोंडाला कपडा बांधून उभे होते. तेव्हा त्या महिलेला शंका आली आणि ती धावत खाली आहे. ती जशी खाली आली तसे ते तीन युवक घराची भींत ओलांडून घरी शिरण्याचा प्रयत्न करत होते.
यह वीडियो अमृतसर का बताया जा रहा है
— Mohit (@Themassmohit) October 1, 2024
एक महिला ने बहादुरी से तीन चोरों का सामना किया दरअसल उसके घर तीन चोर चोरी करने आए थे पर उनके सारे पृयास असफल साबित हुए |
इस महिला की बहादुरी के लिए एक लाइक तो बनता है| pic.twitter.com/SnAf08ZPOi
महिलेने थोडासाही विलंब न करता दरवाजा बंद केला. ते चोर दरवाजाला बाहेरुन जोरात धक्का देऊ लागले. पण महिलेने दरवाजा उघडू दिला नाही. ती दरवाजाला जोरा अडवून राहली. या सगळ्या झटापटीत घराची कडी तुटली पण महिलेने हार मानली नाही.
या व्हिडीओ ती महिला खाली धावत आलेली दिसते. यानंतर महिलेने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर बाहेर जोर येताना दिसतोय. बाहेरुन काही जण दरवाजा ढकलताना दिसत आहेत. ती महिला जमेल तेवढा जोर काढून दरवाजाला आतून ढकलत आहे. या झपाटीत बराच वेळ जातो. महिला एक हात घट्ट दरवाजा धरुन ठेवते आणि दुसऱ्या हाताने दरवाजाची कढी लावते. यानंतर ती महिला सोफा ओढण्याचा प्रयत्न करते. सोफा ओढून ती महिला दरवाजा एकदम बंद करुन टाकते. जेणे करुन चोर घरात शिरणार नाहीत.